शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

जागेवरील अतिक्रमणावरुन हुपरीत राडा, गोंधळामुळे आली पोलीस अधिकाऱ्यालाच चक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 17:34 IST

चर्मकार समाजाच्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून दोन्ही गटात आज पुन्हा जोरदार राडा झाला. दोन महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ व आरडा ओरड झाली.

हुपरी : चर्मकार समाजाच्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून दोन्ही गटात आज पुन्हा जोरदार राडा झाला. दोन महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ व आरडा ओरड झाली. या प्रचंड गोंधळामुळे बंदोबस्तासाठी असलेले तेथील सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांना चक्कर आली. गिरी यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. मागील दोन दिवसापुर्वीच याच कारणावरुन गावात वाद झाला होता.चर्मकार समाजाच्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून मागील दोनच दिवसापुर्वीच गावात वाद झाला होता. आज पुन्हा याच कारणावरुन गावात दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी यातील एका गटाकडून झोपड्या पाडून टाकल्याचा आरोप करण्यात आला. पोलिस आणि आंदोलनकर्त्यांचा जोरदार आरडाओरडा आणि बघून घेण्याची भाषा यामूळे वातावरण तणावपूर्ण बनले. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. यावेळी बंदोबस्तासाठी आलेल्या सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांना तेथील गोंधळामुळे चक्कर आली. गिरी यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तर अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या त्या दोन महिलांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.हुपरी हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर २८८ मधील गट नंबर ९२५/८अ ही जमीन समस्त चर्मकार समाज दिली आहे. मात्र याचा कब्जा मिळावा म्हणून गेल्या सोमवारपासून उपोषण सुरू आहे. आंदोलनकर्त्यानी या जागेवर झोपड्या घातल्यामुळे चर्मकार समाजाच्या दुसऱ्या गटाने त्याला विरोध केला. त्यामुळे जोरदार मारामारी व दगडफेक झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस