शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Fuel Hike : पेट्रोलची शंभरी, डिझेल नव्वदी पार,करांमुळे वाढले दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 18:19 IST

Fuel Hike : आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील चढ-उतार आणि केंद्रासह राज्य सरकारच्या विविध करांच्या बोजामुळे गुरुवारी पेट्रोल १०० रुपये २२ पैसे, तर डिझेल ९० रुपये ४७ पैसे प्रतिलिटर भाव झाले. त्यामुळे आता एक लिटर पेट्रोलसाठी शंभर रुपयांची नोट मोजावी लागणार आहे. कोविडमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. त्यात पेट्रोलची दरवाढ म्हणजे महागाईला आमंत्रण असल्याची संतप्त भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे पेट्रोलची शंभरी, डिझेल नव्वदी पार क्रूड दरातील चढ-उतारासह केंद्र, राज्य सरकारच्या करांमुळे वाढले दर

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील चढ-उतार आणि केंद्रासह राज्य सरकारच्या विविध करांच्या बोजामुळे गुरुवारी पेट्रोल १०० रुपये २२ पैसे, तर डिझेल ९० रुपये ४७ पैसे प्रतिलिटर भाव झाले. त्यामुळे आता एक लिटर पेट्रोलसाठी शंभर रुपयांची नोट मोजावी लागणार आहे. कोविडमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. त्यात पेट्रोलची दरवाढ म्हणजे महागाईला आमंत्रण असल्याची संतप्त भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.गेल्या तीस वर्षांत पेट्रोल ७५, तर डिझेल ६५ रुपयांनी वाढले आहे. तरीसुद्धा कोल्हापूरकर दिवसाला ६ लाख २५ हजार लिटर डिझेल, तर ५ लाख ५० हजार लिटर पेट्रोल आपल्या वाहनातून घालून फिरतात. विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांत पेट्रोल तब्बल ९ रुपये ६९ पैशांनी, तर डिझेल १० रुपये ९० पैशांनी वाढले आहे. ही भाववाढ आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील क्रूड तेल प्रति बॅरेलच्या किमतीवर ठरते, असे म्हटले जाते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल वाढले की भावावाढ अटळ ठरते. मात्र, तेथे प्रति बॅरेलचे दर कमी झाले, तरी येथे मात्र कमी होत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.

सध्या लोकांच्या हातात पैसे नसल्याने त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेल विक्रीवर झाला आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून पेट्रोल, डिझेल विक्रीत ५० टक्के घट झाली आहे. यात आठ दिवसांचा लॉकडाऊनमध्ये हीच विक्री २० टक्केवर आली होती. त्यामुळे या काळात ८० टक्के विक्रीत घट झाली आहे.

लॉकडाऊन उठल्यानंतर, पुन्हा विक्रीत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, ती पूर्ववत ५० टक्केवर आली आहे. अनेकांनी वाहनांऐवजी सायकल चालविण्यास प्राधान्य दिले आहे. तरीसुद्धा पेट्रोल शंभरी पार केले म्हटल्यावर अनेकांंनी संताप व्यक्त केला आहे. या दरवाढीत केंद्र आणि राज्य सरकारचे करांचा बोजा मोठा आहे. हा पेट्रोल व डिझेलच्या मूळ किमतीपेक्षा अधिकचा आहे. 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलkolhapurकोल्हापूर