पेट्रोलची शंभरी, डिझेल नव्वदी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST2021-05-28T04:18:18+5:302021-05-28T04:18:18+5:30

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील चढ-उतार आणि केंद्रासह राज्य सरकारच्या विविध करांच्या बोजामुळे गुरुवारी पेट्रोल १०० रुपये २२ पैसे, ...

Hundreds of petrol, ninety cross diesel | पेट्रोलची शंभरी, डिझेल नव्वदी पार

पेट्रोलची शंभरी, डिझेल नव्वदी पार

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील चढ-उतार आणि केंद्रासह राज्य सरकारच्या विविध करांच्या बोजामुळे गुरुवारी पेट्रोल १०० रुपये २२ पैसे, तर डिझेल ९० रुपये ४७ पैसे प्रतिलिटर भाव झाले. त्यामुळे आता एक लिटर पेट्रोलसाठी शंभर रुपयांची नोट मोजावी लागणार आहे. कोविडमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. त्यात पेट्रोलची दरवाढ म्हणजे महागाईला आमंत्रण असल्याची संतप्त भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

गेल्या तीस वर्षांत पेट्राेल ७५, तर डिझेल ६५ रुपयांनी वाढले आहे. तरीसुद्धा कोल्हापूरकर दिवसाला ६ लाख २५ हजार लिटर डिझेल, तर ५ लाख ५० हजार लिटर पेट्रोल आपल्या वाहनातून घालून फिरतात. विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांत पेट्रोल तब्बल ९ रुपये ६९ पैशांनी, तर डिझेल १० रुपये ९० पैशांनी वाढले आहे. ही भाववाढ आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील क्रूड तेल प्रति बॅरेलच्या किमतीवर ठरते, असे म्हटले जाते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल वाढले की भावावाढ अटळ ठरते. मात्र, तेथे प्रति बॅरेलचे दर कमी झाले, तरी येथे मात्र कमी होत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. सध्या लोकांच्या हातात पैसे नसल्याने त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेल विक्रीवर झाला आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून पेट्रोल, डिझेल विक्रीत ५० टक्के घट झाली आहे. यात आठ दिवसांचा लाॅकडाऊनमध्ये हीच विक्री २० टक्केवर आली होती. त्यामुळे या काळात ८० टक्के विक्रीत घट झाली आहे. लाॅकडाऊन उठल्यानंतर, पुन्हा विक्रीत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, ती पूर्ववत ५० टक्केवर आली आहे. अनेकांनी वाहनांऐवजी सायकल चालविण्यास प्राधान्य दिले आहे. तरीसुद्धा पेट्रोल शंभरी पार केले म्हटल्यावर अनेकांंनी संताप व्यक्त केला आहे. या दरवाढीत केंद्र आणि राज्य सरकारचे करांचा बोजा मोठा आहे. हा पेट्रोल व डिझेलच्या मूळ किमतीपेक्षा अधिकचा आहे.

चौकट

केवळ दोन दिवसच दर कमी

३० मार्च रोजी पेट्रोल ९६.८६, तर डिझेल ८६.५७, तर १५ एप्रिलला पेट्रोल प्रतिलिटर ९६.७१, तर डिझेल प्रतिलिटर ८६.४२ असा दर कमी होता.

गेल्या सहा महिन्यांतील वाढ अशी-

महिना पेट्रोल, डिझेल ५ जानेवारी २१ ९०.५३ ७९.५७

१४ जानेवारी २१ ९१.२५ ८०.३७

४ फेब्रुवारी २१ ९३.११ ८२.८३

२० फेब्रुवारी २१ ९६.८८ ८६.६६

२७ फेब्रुवारी २१ ९७.४४ ८७.१८

२४ मार्च २१ ९७.२७ ८७.०१

३० मार्च २१ ९६.८६ ८६.५७

१५ एप्रिल २१ ९६.७१ ८६.४२

५ मे २१ ९७.०६ ८६.८६

११ मे २१ ९८.०८ ८८.१४

१८ मे २१ ९९.०९ ८९.३४

२५ मे २१ ९९.८८ ९०.४७

२७ मे २१ १००.२२ ९०.४७

कोट

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात दरात चढ-उतार सुरू आहे. त्यात राज्य आणि केंद्र सरकारचे कर मूळ किमतीपेक्षा जास्त आहेत. कोविड-१९ चा दरावर मोठा परिणाम राहिला आहे. त्यामुळे दरात वाढ होत आहे.

- गजकुमार माणगावे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल, डिझेल असोसिएशन

Web Title: Hundreds of petrol, ninety cross diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.