घोडावत ग्रुपचे दुष्काळग्रस्तांसाठी सव्वा कोटी

By Admin | Updated: August 27, 2015 00:36 IST2015-08-27T00:36:47+5:302015-08-27T00:36:47+5:30

संजय घोडावत यांचा पुढाकार : अडीच हजार शेतकऱ्यांना लाखमोलाची मदत

Hundred crore rupees for the group's drought affected | घोडावत ग्रुपचे दुष्काळग्रस्तांसाठी सव्वा कोटी

घोडावत ग्रुपचे दुष्काळग्रस्तांसाठी सव्वा कोटी

कोल्हापूर : वडील दानचंदजी घोडावत यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून व आई सुशिला घोडावत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्योगपती संजय घोडावत यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील अल्पभूधारक अडीच हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत घोडावत समूह करणार आहे. झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही रक्कम कमी असली तरी ती आजच्या अडचणीच्या काळात लाखमोलाची आहे.गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदा पाऊस अत्यंत कमी झाला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जाताना शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू शेतकऱ्यांना संजीवनी देण्याचे काम घोडावत यांनी हाती घेतले आहे. संजय घोडावत ग्रुप व संजय घोडावत इन्स्टिट्युशन्स अतिग्रे यांच्यातर्फे हा माणुसकी जपणारा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शिरोळ व हातकणंगले तालक्यांतील बहुसंख्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. एक एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेले कोरडवाहू शेतकरी व ज्यांचे ऊस लागवड व्यतिरिक्त इतर कोणत्याही दुष्काळ नैसर्गिक आपत्ती तसेच अन्य मार्गाने पिकांचे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्याला पाच हजार रुपयांची मदत देण्यात येईल. छाननी समितीने ग्राह्ण धरलेल्या अर्जांचाच फक्त विचार करण्यात येईल. निवड समितीद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना पोस्टाद्वारे कळविण्यात येईल. त्यानंतर क्रमाक्रमाने आर्थिक मदत दिली जाईल. संजय घोडावत ग्रुप व संजय घोडावत इन्स्टिटयुशन्स सामाजिक भान बाळगून नैसर्गिक आपत्तीच्यावेळी आपत्तीग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहे. ग्रुपने पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, भूकंपग्रस्त यांना कायमच मदतीचा हात दिला आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील गरजूंनाही नेहमीच मदत केली आहे. (प्रतिनिधी)

कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन
सात-बाराचा उतारा व शेतकरी पुरावा, शेतसारा पावती, आधारकार्ड, नुकसान झाल्याचा पंचनामा आदी कागदपत्रांसह नुकसानभरपाई मिळण्याच्या विनंती अर्जासह आठ दिवसांच्या आत संजय घोडावत इन्स्टिट्यूशन्स, अतिग्रे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) या पत्त्यावर पाठवावा, असे आवाहन घोडावत यांनी केले आहे.

Web Title: Hundred crore rupees for the group's drought affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.