सीएनएक्ससाठी विनोद - जोक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST2021-07-09T04:15:55+5:302021-07-09T04:15:55+5:30

जुन्या भिंतीत काहीतरी असू शकतं म्हणून लोक सावध होते. आणि अचानक खण्ण आवाज झाला. मग हळूहळू माती बाजूला सरकवून, ...

Humor for CNX - Jokes | सीएनएक्ससाठी विनोद - जोक्स

सीएनएक्ससाठी विनोद - जोक्स

जुन्या भिंतीत काहीतरी असू शकतं म्हणून लोक सावध होते. आणि अचानक खण्ण आवाज झाला.

मग हळूहळू माती बाजूला सरकवून, बॅटरीच्या प्रकाशात सगळे पाहायला लागले तर काहीतरी चकाकत होतं. मोहरांनी भरलेला हंडा, गुप्तधन वगैरे चर्चा सुरू झाली.

जेव्हा माती बाजूला करून हळुवार ती वस्तू बाहेर काढली तर एक डबा होता. तो देखील जुना पितळी. सगळे आणखीनच चकित झाले.

जेव्हा डबा उघडून पाहिला तर आत फ्रेश चिवडा !

मग कोणाच्या तरी लक्षात आलं.

तर, तो बाजूच्या घरातल्या भिंतीत असलेल्या कपाटातला होता.

------------------------

जुन्या वर्ग मित्र-मैत्रिणींच्या संमेलनात एका वर्गमित्राने व्यक्त केलेली भावना….

शाळेत असताना एक सुंदर मुलगी माझ्याकडून नेहमी ‘होम वर्क’ करून घ्यायची.

त्यामुळे सर्व मुलं माझ्यावर जळायची.

मी खुश व्हायचो !

बघा काय नशिबात असतं.

आज तीच मुलगी माझी बायको आहे,

पण तीची ‘ती’ सवय अजूनही कायम आहे.

सारं ‘होम वर्क’ आजही ती माझ्याकडूनच करून घेते.

अन् तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्यावर जळतात.

------------------------------------------------

आपला नवरा किती फास्ट पळू शकतो.

हे बघायचे असेल तर,

फक्त जोरात ओरडा ‘मोबाईल वाजतोय उचलू का?’

-------------------------------------------------------------

तुमचा मुलगा अचानक प्रसाद वाढायला पुढे पुढे जाऊ लागला, की समजायचं होणारी सुनबाई आरतीला आली आहे.

--------------------------------------------------------------

Web Title: Humor for CNX - Jokes