शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बारावीची परीक्षा बुधवारपासून, तयारी पूर्ण; कोल्हापूर विभागातून सुमारे १ लाख २९ हजार परीक्षार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 18:46 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) बुधवार (दि. २१) पासून सुरू होणार आहे. यात सकाळी अकरा ते दोन या वेळेत पहिला पेपर इंग्रजीचा होणार आहे. कोल्हापूर विभागातून यावर्षी सुमारे एक लाख २९ हजार ९३९ परीक्षार्थी आहेत.

ठळक मुद्देबारावीची परीक्षा उद्यापासून, तयारी पूर्णकोल्हापूर विभागातून सुमारे १ लाख २९ हजार परीक्षार्थी

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) बुधवार (दि. २१) पासून सुरू होणार आहे. यात सकाळी अकरा ते दोन या वेळेत पहिला पेपर इंग्रजीचा होणार आहे. कोल्हापूर विभागातून यावर्षी सुमारे एक लाख २९ हजार ९३९ परीक्षार्थी आहेत.या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर विभागातील १५४ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यासाठी कोल्हापूरमध्ये ६१, सातारा जिल्ह्यात ४५ आणि सांगली जिल्ह्यात ४८ परीक्षा केंद्रे आहेत. ही परीक्षा दि.२० मार्चपर्यंत होणार आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी परीक्षा मंडळाने कोल्हापूर विभागाने एकूण १९ भरारी पथके नेमली आहेत.कोल्हापूर जिल्ह्यासाठी सात आणि सांगली व सातारा जिल्ह्यांसाठी प्रत्येकी सहा भरारी पथके कार्यान्वित असणार आहेत. त्यासह प्रत्येक जिल्हा प्रशासनाची भरारी पथके असणार आहेत. त्यासह दक्षता पथकेदेखील गोपनीय पद्धतीने कार्यरत असतील. परीक्षा केंद्रांवर शांततेत प्रवेश करण्याच्या सूचना भरारी पथकांना दिल्या आहेत, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाच्या सचिव पुष्पलता पवार यांनी दिली.

मोबाईल बंदीविद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर मोबाईल बंदी आहे; पण केंद्रांवरील सर्व पर्यवेक्षकांनाही मोबाईल बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी आपले मोबाईल केंद्र संचालक यांच्याकडे जमा करायचे आहेत. पर्यवेक्षकांना परीक्षा कालावधीत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रत्येक केंद्र संचालकांचे नंबर पर्यवेक्षकांना यापूर्वीच दिले आहेत. त्यांनी तो घरामध्ये देण्याचा आहे. गरज पडल्यास केंद्र संचालकांना संपर्क साधावयाचा आहे.

परीक्षार्थींनी अर्धा तास आधी यावेपरीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पेपरपूर्वी अर्धा तास हजर होणे आवश्यक आहे. अकरा वाजता पेपर असलेल्या परीक्षार्थींना साडेदहा वाजता परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाच्या सचिव पुष्पलता पवार यांनी दिली. १०.४० वाजता उत्तरपत्रिका आणि १०.५० वाजता प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. दहा मिनिटांत त्यांनी प्रश्नपत्रिका वाचून घ्यावी.

अकरा वाजता लिहिण्याची परवानगी दिली जाईल. दुपारी तीनच्या पेपरसाठी परीक्षार्थींना २.३० वाजता परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. २.४० वाजता उत्तरपत्रिका देण्यात येईल. त्यानंतर २.५० वाजता प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. दहा मिनिटांत त्यांनी प्रश्नपत्रिका वाचून घ्यावी. तीन वाजता लिहिण्याची परवानगी दिली जाईल. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तणावविरहित परीक्षा द्यावी. परीक्षेबाबत मार्गदर्शनासाठी समुपदेशकांशी चर्चा करावी, असे आवाहन सचिव पवार यांनी केले आहे.

जिल्हानिहाय परीक्षार्थी

  1. *कोल्हापूर : ३५९४
  2. *सांगली : ३६८३५
  3. *सातारा : ३९५१०

 

हेल्पलाईनची सुविधादहावी, बारावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करण्यासह त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाने जिल्हानिहाय समुपदेशकांच्या माध्यमातून हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यासह विभागीय मंडळाच्या कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून, त्यासाठी दूरध्वनी क्रमांक (०२३१-२६९६१०१, २६९६१०२, २६९६१०३) यावर सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.जिल्हानिहाय समुपदेशक असे

  1. * कोल्हापूर : भीमगोंडा पाटील (९९२३१४९०३९)
  2. * सांगली : सुरेखा माने (९९२२३५३७५२)
  3. * सातारा : शांतीनाथ मल्लाडे (९९२२२११५६४)

 

 

टॅग्स :examपरीक्षाkolhapurकोल्हापूरSangliसांगलीSatara areaसातारा परिसर