शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ साहेब माझ्यावेळीच हिमालय वितळतोय कसा?, बाबासाहेब पाटील यांची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 16:05 IST

‘बाबासाहेब तुम्हाला लहानाचा मोठा मीच केला, आमदारकीला उभे केले. सहकारी संस्था व इतर राजकारण वेगळे असते, काही ठिकाणी तडजोडीची भूमिका घ्यावी लागते.

पोर्ले तर्फ ठाणे : जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समितीच्या निवडणुकीत सातत्याने आपल्यावर अन्याय झाला, मुश्रीफ साहेब इतरांच्या पाठीमागे तुम्ही हिमालयासारखे राहता, मग माझ्या वेळीच हा हिमालय वितळतोय कसा, अशी विचारणा जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी शुक्रवारी मेळाव्यात केली. ‘बाबासाहेब तुम्हाला लहानाचा मोठा मीच केला, आमदारकीला उभे केले. सहकारी संस्था व इतर राजकारण वेगळे असते, काही ठिकाणी तडजोडीची भूमिका घ्यावी लागते, असे असले तरी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी तुमच्या मागे ताकद उभी करू,’ असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पन्हाळा-शाहूवाडीचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी स्वागतामध्ये बाबासाहेब पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला. हाच धागा पकडून बाबासाहेब पाटील म्हणाले, बाजार समितीला आमच्या विरोधकांना पाच जागा दिल्याने आमचे खच्चीकरण झाले. ‘गोकुळ’ला संधी दिली नाही, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही उमेदवारी कापली, यामुळे पन्हाळा, शाहूवाडीतील पक्ष कमकुवत होत आहे. सगळ्यांच्या मागे तुम्ही हिमालयासारखे असता, मग माझ्यावेळीच हा हिमालय का वितळतोय?यावर आमदार मुश्रीफ म्हणाले, बाबासाहेब पाटील यांना दत्त-आसुर्ले कारखान्याचा अध्यक्ष करणे, त्या कारखान्यास अर्थसाहाय्य करण्याची भूमिका आपणच घेतली. जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत मार्केटिंग प्रोसेसिंगमधून संधी दिली. यावेळेला बँक बिनविरोध करण्याची भूमिका घेतली, पण त्यामध्ये बाबासाहेब पाटील हे अडसर होते. त्यांना थांबवले नाहीतर आमदार चंद्रकांत पाटील, प्रकाश आवाडे, विनय काेरे, प्रकाश आबीटकर, चंद्रदीप नरके हे दुसरे पॅनेल करणार होते. हे टाळण्यासाठी बाबासाहेबांना स्वीकृत म्हणून घेण्याचा निर्णय घेतला.

बाबासाहेब तुम्हाला ‘त्या’ संस्था माहिती होत्या का?

बँकेच्या मागील निवडणुकीत बाबासाहेबांना मार्केटिंग प्रोसेसिंगमधील संस्था कोठे होत्या हे माहिती नव्हत्या. मीच काढलेल्या संस्था बाबासाहेबाच्या ताब्यात दिल्या आणि हा गडी संस्थाच घेऊन गेल्याचा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफ