शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठरलेल्या शस्त्रक्रिया रद्द करून डॉक्टर जातातच कसे? भाजप शिष्टमंडळाचा मंत्री मुश्रीफ यांना सवाल

By समीर देशपांडे | Updated: December 22, 2023 15:59 IST

कोल्हापूर : शस्त्रक्रिया ठरल्याने रूग्ण उपाशी राहतो. परंतू भूल देेणारे डॉक्टर गेलेत म्हणून दोन, तीन शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरही निघून जातात. ...

कोल्हापूर : शस्त्रक्रिया ठरल्याने रूग्ण उपाशी राहतो. परंतू भूल देेणारे डॉक्टर गेलेत म्हणून दोन, तीन शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरही निघून जातात. ठरलेल्या शस्त्रक्रिया रद्द करून डॉक्टर जातातच कसे असा सवाल भाजपच्या शिष्टमंडळाने वैदयकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शुक्रवारी विचारला.येथील शासकीय विश्रामगृहावर शिष्टमंडळाने येथील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातील प्रश्नांबाबत मुश्रीफ यांच्याशी यावेळी सविस्तर चर्चा केली. न्यूरोसर्जरीचे काम ठप्प असणे, न्यूरामायक्रोस्कोपची गरज, एमआरआयसाठीची यंत्रणा, नवजात बाळांसाठी आवश्यक असणाऱ्या इन्क्युबेटरची संख्या कमी, दिव्यांगांची तपासणी पहिल्या मजल्यावर असणे अशा अनेक अडचणी मांडल्या.भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, उद्या तुमच्यावर शस्त्रक्रिया होणार म्हणून रूग्णांना उपाशी रहायला सांगितले जाते आणि दुसऱ्या दिवशी दोन, तीन शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टर भूलतज्ज्ञ नाही म्हणून निघून जातात हे चित्र बरोबर नाही. यावेळी महेश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही तक्रारी मांडल्या. यावेळी राहूल चिकोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले, एमआरआयची यंत्रणा पीपीपी तत्वावर उभारण्यात येणार आहे. अन्य आवश्यक यंत्रणा आणि सोयी, सुविधांसाठी अधीष्ठाता यांच्याशी चर्चा करून येत्या आठ दिवसात हे प्रश्न सोडविले जातील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयHasan Mushrifहसन मुश्रीफBJPभाजपा