शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षावाल्याकडे दहा हजार कोटींची मालमत्ता कशी?, शरद कोळी यांचा प्रश्न 

By भीमगोंड देसाई | Updated: September 14, 2023 15:34 IST

कोल्हापुरात शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचा मेळावा

कोल्हापूर : शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे आजारी असताना चाळीस गद्दार गुजरात, गुवाहाटीमार्गे जात भाजपच्या वळचणीला जाऊन सत्तेवर आले. ठाकरे यांनी त्यांना आमदार, खासदार मंत्री केले तरीही त्यांनी निष्ठा गुंडाळून ठेवली. सत्तेत गेल्यानंतर ठाकरे यांच्या मालमत्तेविषयी बोलणाऱ्या रिक्षावाल्याने दहा हजार कोटींची मालमत्ता कशी जमवली असा प्रश्न ठाकरे गट शिवसेना युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता विचारला. येथील सूर्या हॉलमध्ये आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.ते म्हणाले, अजित पवार निधी देत नाहीत, आम्हाला अडचणीत आणत आहेत. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो असे ४० गद्दार सांगत होते. आता तेच अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. कोंबडी, सायकल चोर, पाणपट्टीवाल्यांना आमदार करून मंत्री केले. तेच आता ठाकरे यांच्यावर टिका करीत आहेत. त्यांना २०२४ च्या निवडणुकीत जनता धडा शिकवले. निवडणूक आयोग, ईडी भाजपची सालगडी बनली आहे. यामुळे सामान्यांना न्याय मिळणे अवघड झाले आहे. कोकणातील दीडफुट्या तर वारंवार उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करीत असतो. त्याला भाजपने यासाठीच नेमला आहे. भाजपचा जनाधार कमी होत असल्याने जातीय दंगल घडवून आणण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसैनिकांनी सावध राहिले पाहिजे.जिल्हाप्रमुख् संजय पवार म्हणाले, आगामी काळात लोकसभा, विधानसभेच्या व इतर निवडणुका लागणार आहेत. यामुळे शिवसैनिकांनी कामाला लागावे. रविकिरण इंगवले, विशाल देवकुळे, सुनील मोदी यांची भाषण झाली. यावेळी दिनेश साळवी, प्रतिज्ञा उत्तूरे, महेश उत्तूरे, अवधूत साळोखे, मंजीत माने, राजू यादव, विनोद खोत, विराज पाटील, प्रियंका माने आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे