‘कसा आहेस भावा?...’ने तरुणाई बेहोश

By Admin | Updated: August 7, 2014 00:25 IST2014-08-07T00:04:44+5:302014-08-07T00:25:10+5:30

‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे आयोजन : ‘महावीर’, ‘राजाराम’मध्ये ‘रेगे’ चित्रपटाचे प्रमोशन

'How are you brother? ...' the youthful faintness | ‘कसा आहेस भावा?...’ने तरुणाई बेहोश

‘कसा आहेस भावा?...’ने तरुणाई बेहोश

कोल्हापूर : ‘त्या’ तिघांना पाहण्यासाठी सभागृहात तरुणाईने तुडुंब गर्दी केली होती आणि त्या तिघांपैकी एकाने ‘कसा आहेस भावा?...’ या एका कोल्हापुरी वाक्याने उपस्थित तरुण-तरुणींना अक्षरश: जिंकले. निमित्त होते ‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे आयोजित ‘रेगे’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनचे!
महावीर महाविद्यालयात आज, बुधवारी सकाळी ‘रेगे’ चित्रपटाच्या टीमचे जंगी स्वागत झाले. या सर्व कलाकारांना पाहण्यासाठी व त्यांची छबी मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तरुण-तरुणींनी गर्दी केली. यामध्ये चित्रपट निर्माता, दिग्दर्शक अभिजित पानसे, मुख्य अभिनेता आरोह वेलणकर व संतोष जुवेकर यांचा समावेश होता. महाविद्यालयाच्या आचार्य विद्यानंद सांस्कृतिक सभागृहात प्राचार्य डॉ. संभाजीराव कणसे यांनी स्वागत केले. अभिनेता संतोष जुवेकरने उपस्थित तरुणांशी ‘कसा आहेस भावा?... ’, ‘कशा आहेत माझ्या भावांच्या मैत्रिणी...’ आणि ‘जय महाराष्ट्र’ म्हणत संवाद साधला. त्याच्या या अदाकारीने तरुणाई आणखीनच सळसळली. चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष न दिल्यास काय परिणाम होतात, याचे चित्रीकरण चित्रपटात केल्याचे सांगितले. ‘लोकमत युवा नेक्स्ट’ने महावीर महाविद्यालयात घेतलेल्या कलाविष्कारातील विजेत्यांचा या कलाकारांच्या हस्ते गौरव झाला. यामध्ये प्रथम क्रमांक : लघुनाटिका ‘मिशन २०१४’ यासाठी प्रसाद माळी, दिग्विजय कालेकर यांचा संघ, तर द्वितीय क्रमांक दीप्ती साबळे हिने पटकाविला.
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘रेगे’ची टीम राजाराम महाविद्यालयात दुपारी तीन वाजता पोहोचली. त्यावेळी तिचे स्वागत प्राचार्य डॉ. वसंतराव हेळवी यांनी केले. महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रथम ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘चौकट राजा’ या चित्रपटातील एक दृश्य दाखविण्यात आले. यावेळी अभिजित पानसे यांनी चित्रपटामागील भूमिका विशद केली, तर अभिनेता संतोष जुवेकर याने ‘रेगे’ चित्रपटातील भूमिका व चित्रपट चित्रपटगृहामध्येच जाऊन पाहण्याचा आग्रह केला.

Web Title: 'How are you brother? ...' the youthful faintness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.