भादोले येथे घरोघरी सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST2021-05-19T04:23:06+5:302021-05-19T04:23:06+5:30
भादोले येथे कोरोना रुग्ण वाढत असताना आशासेविकांना मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मलगन उपलब्ध नव्हते. कोरोना रुग्णाच्या घरांना फलक नव्हते, याबदल ...

भादोले येथे घरोघरी सर्व्हे
भादोले येथे कोरोना रुग्ण वाढत असताना आशासेविकांना मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मलगन उपलब्ध नव्हते. कोरोना रुग्णाच्या घरांना फलक नव्हते, याबदल लोकमतने बातमी प्रसिद्ध केली होती. यानंतर सभापती प्रदीप पाटील यांनी आरोग्य यंत्रणेची तसेच कोरोना समितीची बैठक घेऊन झाडाझडती घेतली होती.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने आशासेविकांना ऑक्सिजन, थर्मलगनसह साहित्य उपलब्ध करून दिले. दक्षता समिती आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य यांचे पथक तयार करून घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्यात आले
सरपंच आनंदा कोळी, धोंडीराम पाटील, पोलीसपाटील हर्षवर्धन माने, तलाठी तुषार भोसले, कोतवाल संजय अवघडे, ग्रामसेवक श्यामसुंदर मुसळे, आरोग्य अधिकारी माहेश्वरी कुंभार या कामासाठी सक्रिय झाले आहेत.