शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

जयसिंगपूर पालिका देणार कचºयासाठी घरोघरी कुंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 11:26 PM

जयसिंगपूर : ‘स्वच्छ महाराष्ट्र’ आवाहनास प्रतिसाद देत व शहरातून दररोज निघणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

ठळक मुद्देगांडूळ खत प्रकल्प उभारणार :३५ लाख रुपयांचा निधी खर्च करणार

संदीप बावचे ।जयसिंगपूर : ‘स्वच्छ महाराष्ट्र’ आवाहनास प्रतिसाद देत व शहरातून दररोज निघणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वच्छ महाराष्ट्रांतर्गत मिळालेल्या निधीतून घरोघरी कचराकुंड्या (डस्टबिन) देण्याचे नियोजन केले आहे. गांडूळ खत प्रकल्प राबविण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा केलाजाणार असून, मिळणाºयास्वतंत्र ओल्या कचºयातून खताची निर्मिती केली जाणार आहे. कचराकुंड्यांसाठी निविदा काढण्यात आली असून, त्यासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.कचराकुंड्यांसाठी निविदा

नगरपालिकेकडे घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहरामध्ये ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प राबवावा. स्वच्छ महाराष्ट्र अभियान घनकचरा नियमांतर्गत घनकचरा विलगीकरण मोहीम सुरू करावी, असे शासनाचे परिपत्रक पालिकेला आले आहे. त्यामुळे पालिका सभेत चिपरी येथील कचरा डेपोच्या जागेवर गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प राबविण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. शहरात दररोज १७ टन कचरा संकलित केला जातो. यामध्ये अंदाजे १० टन ओल्या कचºयाचा समावेश आहे.

खत प्रकल्पासाठी ओल्या कचºयाची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वच्छतेचा संदेश आणि खत प्रकल्पाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी पालिका मोहीम राबविणार आहे. स्वच्छ महाराष्ट्रांतर्गत मिळालेल्या निधीतून घरोघरी कचराकुंड्या दिल्या जाणार आहेत. गेल्या दहा वर्षांत शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. उपनगरांमुळे आरोग्य विभागासमोर कचरा उठाव करणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता, तुंबलेल्या गटारींच्या स्वच्छतेचे आव्हान पालिकेसमोर आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे स्वच्छतेबाबत पालिकेकडे तक्रारी येतात. शासनाचे उद्दिष्ट आणि स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कचराकुंड्या देण्याबाबत निविदा काढण्यात आली आहे. घंटागाड्याद्वारे ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याच्या दृष्टिकोनातून कचराकुंड्या नागरिकांना दिल्या जाणार असून, घंटागाड्याद्वारे शहरातील कचरा संकलित करण्याचे पालिकेने नियोजन केले आहे.पालिकेची जबाबदारीस्वच्छ महाराष्ट्रांतर्गत हागणदारीमुक्त पुरस्कार स्वीकारल्यानंतर जयसिंगपूर पालिकेची जबाबदारी वाढली आहे. ‘घर तिथे शौचालय’ उभारण्याचा संकल्प पालिकेने यापूर्वीच हाती घेतला आहे. मात्र, शहरातील कचºयाच्या प्रश्नाचे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. मंगळवारी झालेल्या पालिका सभेत कचरा, मोकाट जनावरे यावरून नगरसेवकांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. 

प्रबोधनाची गरजकचराकुंड्यांबरोबर ओला व सुका कचरा नेमका काय ? याची चित्रासह माहिती असणारी पत्रके वितरित करण्याची गरज आहे. शिवाय ओला कचरा गोळा करणाºया घंटागाड्यांचे नियोजनदेखील महत्त्वाचे आहे. तरच हे अभियान यशस्वी होईल.

स्वच्छ महाराष्ट्रांतर्गत पालिकेला मिळालेल्या निधीतून सुमारे ३५ लाख रुपये कचराकुंड्यांसाठी खर्च केले जाणार आहेत. गांडूळ खत प्रकल्पासाठी शहरातून ओला कचरा संकलित केला जाणार आहे.- राजेंद्र तेली, मुख्याधिकारी जयसिंगपूर