शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

घरफाळ्यात सवलत; पण वेळेचा अपव्यय

By admin | Updated: June 26, 2017 00:55 IST

घरफाळ्यात सवलत; पण वेळेचा अपव्यय

गणेश शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महापालिकेच्या उत्पन्नातील स्रोतांपैकी एक महत्त्वाचा स्र्रोत म्हणजे घरफाळा आहे. दरवर्षीप्रमाणे चालू आर्थिक वर्षातील मिळकतधारकांना पावणेतीन महिन्यांत सहा टक्के सवलतीमुळे गतवर्षीपेक्षा दुप्पट रक्कम घरफाळा विभागाच्या तिजोरीत यंदा जमा झाली; पण घरफाळा भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना नागरी सुविधा केंद्रामध्ये कमी मनुष्यबळामुळे तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत असल्यामुळे मन:स्ताप सहन करावा लागत आहे.शहरातील नागरिकांनी वेळेत व नियमितपणे घरफाळा (मिळकर कर) भरावा या उद्देशाने महापालिकेच्या घरफाळा विभागाने सात वर्षांपासून सुरू केलेल्या विविध सवलतींचा फायदा मिळकतधारकांना होत आहे. कोल्हापुरात सध्या सुमारे एक लाख ४६ हजार मिळकतधारक आहेत. ए, बी, सी, डी आणि ई वॉर्ड अशा वॉर्डांत लोकवस्ती आहे. विशेषत: ए आणि ई वॉर्डांचे क्षेत्रफळ मोठे असल्याने तेथे मिळकतधारकांची संख्या जास्त आहे. या आर्थिक वर्षातील घरफाळा भरणाऱ्या मिळकतधारकांना चालू बिलामध्ये पहिल्या तीन महिन्यांसाठी सहा टक्के, जुलै ते सप्टेंबरसाठी चार टक्के आणि आॅक्टोबर ते नोव्हेंबरसाठी दोन टक्के अशी सवलत आहे. यासाठी नागरी सुविधा केंद्रांसह तीन खासगी बँका आणि या बँकांच्या १५ शाखांमधून धनादेश भरण्याची सोय केली आहे. त्याचबरोबर ज्या मिळकतधारकांना बँकांमध्ये धनादेश भरावयाचा आहे, त्यांनी तो मुदतीपूर्वी भरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील मिळकतधारकांना पूर्ण कराच्या रकमेवर पहिल्या तीन महिन्यांसाठी असलेल्या सहा टक्के सवलतीचा फायदा यंदा गुरुवार (दि. २२) अखेर तब्बल ३४ हजार ७०० मिळकतधारकांना मिळाला आहे. यामधून १३ कोटी ३८ लाख रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले. यामध्ये घरगुती मिळकतधारकांसह विशेषत: व्यावसायिक व औद्योगिक मिळकतधारकांचा यात समावेश आहे.गेल्या वर्षी याच कालावधीत एक एप्रिल ते २२ जून २०१६ अखेर १४ हजार ४८ मिळकतधारकांकडून केवळ सात कोटी आठ लाख रुपये जमा झाले होते. यामुळे शहरातील महापालिकेच्या मुख्य इमारतीसह पाच नागरी सुविधा केंद्रांमध्ये नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसते. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते दुपारपर्यंत असे चित्र असते. याचे काम सात वर्षांपासून एचसीएल इन्फोटेक या कंपनीकडे आहे. या पाच नागरी सुविधा केंद्रांत सुमारे ३० कर्मचारी कार्यरत आहेत.आॅनलाईनला पसंतीगेल्या वर्षी आॅनलाईनमधून केवळ दोन मिळकतधारकांनी ३२२९ रुपये भरले होते. पण, यंदा आॅनलाईनला प्रतिसाद वाढला आहे. १ एप्रिल ते २२ जून २०१७ अखेर १४०२ मिळकतधारकांकडून सुमारे ४६ लाख रुपये जमा झाले असल्याचे घरफाळा विभागाने सांगितले.