कासारवाडी येथे शॉर्टसर्किटने घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:51+5:302021-02-23T04:36:51+5:30

कासारवाडी येथील अमोल चंद्रकांत दळवी यांच्या घरी रविवारी सकाळी ११ वाजता अचानक विद्युत तारेमध्ये स्पार्किंग होऊन आग लागली. आगीमुळे ...

A house caught fire due to short circuit at Kasarwadi | कासारवाडी येथे शॉर्टसर्किटने घराला आग

कासारवाडी येथे शॉर्टसर्किटने घराला आग

कासारवाडी येथील अमोल चंद्रकांत दळवी यांच्या घरी रविवारी सकाळी ११ वाजता अचानक विद्युत तारेमध्ये स्पार्किंग होऊन आग लागली. आगीमुळे घराच्या लाकडी साहित्याने पेट घेतला. यानंतर आग वाढतच गेली. शेजारील बाबासाहेब घाटगे, तानाजी निकम, जितेंद्र देसाई यांच्यासह नागरिकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही वेळात वीज कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्या भागातील वीज पुरवठा खंडित केला; परंतु तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते.

अमोल दळवी हा घरी एकटाच असून त्याची परिस्थिती हलाकीची आहे. या दुर्दैवी घटनेने त्याचा घराचा आसरा नष्ट झाला असून, राहण्याची, खाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी यामध्ये पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे.

फोटो ओळी

कासारवाडी येथे शॉर्टसर्किटने आग लागल्याने घरातील प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले.

Web Title: A house caught fire due to short circuit at Kasarwadi