शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: घराला आग, ७ लाख रुपयांच्या नोटा खाक; आगीत ४० लाखांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:46 IST

सुदैवाने जीवितहानी झाली नाही

चंदगड : राहत्या घराला आग लागून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, साठवलेले धान्य, काजू, संसारोपयोगी साहित्यासह लागलेल्या आगीत ४० लाखांचे नुकसान झाले. ही घटना कानडी (ता. चंदगड) येथे रविवारी सकाळी ९ वाजता घडली असून शाॅर्टसर्किटने आग लागल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.भात व्यापारी केरबा गुंडू चौगुले व आप्पाजी गुंडू चौगुले यांचे मोठे नुकसान झाले. रविवारी वरच्या मजल्यावर अचानक आग लागल्याचे केरबा यांच्या सूनबाईला निदर्शनास आले. तिने आरडाओरडा केला असता गावातील अनेक जण धावून आले. पण लाकडी थाटामुळे बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे लांबच्या लांब लोळ व धुराचे लोट यामुळे आग विझविताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सात लाख रुपये, सोन्याचे दागिन्यासह साहित्य जळून खाक त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करून आग विझविण्यात आली. तत्पूर्वी केरबा हे भात व्यापारी असून खरेदी केलेल्या ग्राहकांच्या भाताची रक्कम देण्यासाठी आणलेले रोख सात लाख रक्कम, दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने, साठवलेले १० टन भात-नाचणा, काजू, संसारोपयोगी साहित्य, कपडे व घर जळून खाक झाले. या आगीत सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले आहे.घटनेचा पंचनामा तलाठी, पोलिस पाटील व पोलिसांनी केला आहे. काजूमुळे आगीचा भडका उडून ग्राहकांच्या धान्याची रोख रक्कम जळाल्याने मोठा फटका बसला आहे.