शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या, चोरट्यांचा कोल्हापूर शहरात धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 14:29 IST

वर्षअखेरीला शहरासह उपनगरांत घरफोडी, लूटमारीच्या घटनांनी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे. चोरट्यांच्या धुमाकुळामुळे नागरिकांसह घरांची सुरक्षितता धोक्याची बनली आहे.

ठळक मुद्देघरफोड्या, चोरट्यांचा कोल्हापूर शहरात धुमाकूळपोलिसांना चोरट्यांचे चॅलेंज : नागरिकांची उडाली झोप

कोल्हापूर : वर्षअखेरीला शहरासह उपनगरांत घरफोडी, लूटमारीच्या घटनांनी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे. चोरट्यांच्या धुमाकुळामुळे नागरिकांसह घरांची सुरक्षितता धोक्याची बनली आहे.

‘दिसले बंद घर की फोडले,’ अशी भयावह अवस्था याठिकाणी पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्याभरापासून चोरट्यांनी धुमाकूळ घालून पोलिसांना थेट चॅलेंज दिले आहे. या वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांची झोपच उडाली आहे.दिवसें-दिवस घरफोड्या, चोरी, लूटमार आदी गुन्ह्यांची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्यांतील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे फारच चिंताजनक ठरत आहे. नाताळच्या सुटीला लोक परगावी गेले आहेत तर काहीजण कुटुंबासह फिरायला बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत बंद घर हेरून ते रात्रीच सोडा दिवसाही फोडण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवस-रात्र गस्तीचे प्रमाण वाढविण्याचे आदेश दिले आहेत; परंतु चोरटे पोलिसांच्या गस्तीची वेळ पाहूनच चोरीचा प्लॅन करत आहेत. पोलीस दप्तरी असलेल्या शेकडो चोºयांचा अद्यापही उलगडा पोलिसांना करता आलेला नाही.कारंडे मळा येथे चोरट्यांनी महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून लाखो रुपयांचा ऐवज भरदिवसा लंपास केला होता. त्यांचा थांगपत्ता शाहूपुरी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना अद्यापही लागलेला नाही. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी होणाऱ्यां लक्ष्मीपूजनाचे पैसे आणि दागिन्यांवरही चोरट्यांनी हात साफ करून घेतले आहेत. गेल्या महिन्याभरातील सर्व घरफोड्या दरवाजा व खिडकीचे लोखंडी गज वाकवून झाल्या आहेत.

दिवसेंदिवस घरफोड्या वाढत असतानाही पोलीस मात्र सुस्त बसले आहेत. रात्र गस्त नाही की घरफोड्यांची उकल करण्यासाठी कोणतेही प्रयत्न नाहीत. घरफोडी झाल्याचे समजताच परिसरात जाऊन पाहणी करायची, चोरीस गेलेला मुद्देमाल कागदावर ओढायचा, एवढे झाले की पुढे तपास ठप्प.

गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात येऊनही त्याकडे ते दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे; त्यामुळे घरफोड्या करूनही चोरटे मोकाट फिरत आहेत. गेल्या महिन्याभरात झालेल्या एकाही घरफोडीचा मागमूस पोलिसांना लागलेला नाही. चौकशी केली असता ‘तपास सुरू आहे,’ इतकेच सांगितले जाते. पोलिसांच्या निष्क्रीय कामगिरीमुळे नागरिकांची झोपच उडाली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर