शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता शिथिल झाल्याने हॉटेल्स, बार फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 12:07 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्याने बुधवारी रात्री हॉटेल्स, बार हाऊसफुल्ल असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळाले. गेले महिनाभर रात्री साडेदहा वाजता हॉटेल्स बंद केली जात होती.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल हॉटेल्स, बार हाऊसफुल्ल असल्याचे शहरात चित्र

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्याने बुधवारी रात्री हॉटेल्स, बार हाऊसफुल्ल असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळाले. गेले महिनाभर रात्री साडेदहा वाजता हॉटेल्स बंद केली जात होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे रात्री साडेदहा वाजता हॉटेल्स आणि बार बंद केले जाऊ लागल्याने या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. एकीकडे सुट्ट्या सुरू झाल्या असतानाही म्हणावा तसा या व्यवसायामध्ये उठाव दिसत नव्हता. अशातच बाहेरगावांहून येणाऱ्या प्रवाशांनाही याचा फटका बसत होता.अनेक खासगी कंपन्यांच्या रात्री होणाऱ्या बैठका, कार्यक्रम, गेट टुगेदर असे कार्यक्रमही आचारसंहितेच्या बडग्यामुळे पुढे ढकलण्यात आले होते. अशातच मंगळवारी (दि. २३) मतदान झाल्याने बुधवारी आचारसंहिता शिथिल झाली. त्यामुळे रात्री शहरातील विविध हॉटेल्स आणि बारवर गर्दी झाली होती. सगळे गोळा होण्यातच दहा वाजायचे. मग हॉटेलात जाऊन काय करायचे या मानसिकतेतून गेले महिनाभर अनेक जण हॉटेलमध्ये किंवा बारमध्ये जात नव्हते; पण ही गर्दी बुधवारी पाहावयास मिळाली.

बुधवार असल्याने जास्त गर्दीआचारसंहिता शिथिल झाल्यानंतरचा पहिला वार म्हणजे बुधवारच आल्याने हॉटेल्समध्ये जेवणासाठी तसेच बारमध्येही गर्दी उडाली होती. या दिवशी शक्यतो कोणाचाही उपवास नसल्याने ही गर्दी वाढल्याचे सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूरhotelहॉटेल