शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हॉटेल, बार, दारू दुकाने रात्री ११ नंतर बंद; आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 16:58 IST

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीमुळे आज, मंगळवार (दि. २१ ऑक्टोबर) पासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व ...

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीमुळे आज, मंगळवार (दि. २१ ऑक्टोबर) पासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व हॉटेल, धाबे, रेस्टॉरंट, बार, परमिट रूम, देशी, विदेशी दारू दुकाने रात्री ११ नंतर बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सोमवारी जारी केले. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील, असे त्यात म्हटले आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश लागू केले आहेत.

आंतरराज्य जिल्हा नाक्यांवर पोलिस, राज्य उत्पादनचे तपासणी पथकनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या आंतरजिल्हा व कर्नाटकमधील बेळगाव या आंतरराज्य नाक्यांवर पोलिस व राज्य उत्पादन शुल्कचे संयुक्त पथक तपासणीसाठी सज्ज असणार आहे. मंगळवारी वरील पाच जिल्हे व कर्नाटक प्रशासनाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या नाक्यांवर सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. शिवाय एसएसटी, एसएस पथके सज्ज असतील.या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयातून कायदा सुव्यवस्था नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, सहायक नोडल अधिकारी नितीन धापसे पाटील, नम्रता शिराणे यांच्यासह पाचही जिल्ह्यांमधील संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.आजवर पोलिसांचे, राज्य उत्पादन शुल्कचे पथक स्वतंत्रपणे नियुक्त केले जात होते. पण यंदा दोन्ही विभागांचे संयुक्त पथकांद्वारे नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जाणार आहे. कर्नाटक, गोवा राष्ट्रीय महामार्गावर चेकपोस्ट उभारण्यात येणार आहे. तसेच आंतरजिल्हा व आंतरराज्य नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असेल. निवडणुकीत मतदारांना मद्य, पैसा यांसह विविध गोष्टींचा प्रलोभने दाखविण्यासाठी वापर केला जाण्याची शक्यता आहे. हा प्रकार रोखण्यासाठी नाक्यांवर विशेष तपासणी पथके असणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाhotelहॉटेल