शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

उगीच म्हणत नाय, आम्ही कोल्हापुरी जगात भारी; हॉटेल चालकाने रक्षाविसर्जनासाठी एक रुपयात दिला उत्ताप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:34 IST

कोल्हापूर : कोल्हापुरात शेवटचा हारही मोफत उपलब्ध करून दिला जातो हे ऐकले होते, पण नैवेद्याचे पैसे घेत नाही हे ...

कोल्हापूर : कोल्हापुरात शेवटचा हारही मोफत उपलब्ध करून दिला जातो हे ऐकले होते, पण नैवेद्याचे पैसे घेत नाही हे मी आज अनुभवले. ‘सलाम त्या माणुसकीला खरंच जगात भारी आम्ही कोल्हापुरी.. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणारं आमचं कोल्हापूर’ अशी पोस्ट संदीप लवटे यांनी शेअर केली. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.कोल्हापूरकरांची माणुसकी, दिलदारपणा, जिवाला जीव लावण्याची पद्धत, मदतीसाठी एका पायावर तयार ही खासियत अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे. पण या स्वभाव वैशिष्ट्याचा अनुभव एका नागरिकाला आला. त्यांनी तो समाज माध्यमावर पोस्ट केला असून, चांगलाच व्हायरल झाला आहे.संदीप लवटे यांनी ‘हे कोल्हापूर आहे, इथे अजून माणुसकी जिवंत आहे’ या मथळ्याखाली ही पोस्ट केली आहे. लवटे यांच्या मावशीच्या पतीचे रविवारी (दि. ६ एप्रिल) निधन झाले. मंगळवारी रक्षाविसर्जन होते. काकांना उत्ताप्पा आवडत असल्याने नैवेद्यात ठेवण्यासाठी ते हॉटेलमधून आणायला सकाळी ७ वाजता कावळा नाका येथील घरातून बाहेर पडले. सगळी हॉटेल बंद असल्याने शोधत शोधत महाद्वार रोडवरील हॉटेल सन्मान येथे आले. हॉटेलचे शटर थोडेसे उघडे ठेवून तयारी सुरू होती. त्यातूनच त्यांनी वाकून विचारले, ‘दादा उत्ताप्पा मिळेल काय?’ बाहेर आवरत असणारा कर्मचारी म्हणाला, ‘अर्धा पाऊण तास लागेल.’ बोलता बोलता त्यांना सांगितले की, रक्षाविसर्जनच्या नैवेद्यासाठी पाहिजे. हे ऐकताच त्यांनी तातडीने उत्ताप्पा तयार करून दिलाच, पण पैसेही घेतले नाहीत. फुकट देत नाही म्हणून एक रुपया घेतला. पैशाच्या मागे पळणाऱ्या जगात फुकट कोणी काही देत नसताना या हॉटेलने वारलेल्या व्यक्तीच्या नैवेद्यासाठी पैसे न घेता त्यांच्या दु:खात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपली. कर्मचारी, आचारी व त्यांना ही पद्धत जपायला लावणाऱ्या हॉटेल सन्मानच्या मालकांचे कौतुकच. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocial Viralसोशल व्हायरल