‘स्वच्छते’वर ठरणार हॉटेलचा दर्जा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 00:48 IST2019-01-01T00:48:20+5:302019-01-01T00:48:45+5:30

गणेश शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारचे निकष पूर्ण करणाऱ्या हॉटेलना अन्न व औषध विभागाच्या वतीने ...

Hotel cleanliness on 'cleanliness'! | ‘स्वच्छते’वर ठरणार हॉटेलचा दर्जा !

‘स्वच्छते’वर ठरणार हॉटेलचा दर्जा !

गणेश शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकारचे निकष पूर्ण करणाऱ्या हॉटेलना अन्न व औषध विभागाच्या वतीने दर्जा दिला जाणार आहे. या विभागाने नवीन वर्षात हॉटेलच्या तपासण्या सुरू केल्या जाणार आहेत. दर्जा दिल्यानंतर त्याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून, यामुळे नवीन वर्षात ग्राहकांना दर्जेदार व शुद्ध अन्नपदार्थ खाण्यास मिळणार आहेत.
ग्राहकांना चांगल्या दर्जाचे व शुद्ध अन्नपदार्थ मिळावेत यासाठी केंद्र्र सरकारच्या अन्न व औषध विभागाकडून याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग कामास लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचतारांकित हॉटेलपासून ते सर्व प्रकारच्या २६६२ हॉटेलची नोंद विभागाकडे आहे. हॉटेलमध्ये ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकारने हॉटेलचा दर्जा ठरविण्यासाठी ४७ निकष घालून दिलेले आहेत. हे काम
कोल्हापूर विभागाचे आठ अन्न सुरक्षा अधिकारी पाहणार आहेत. त्याचा आढावा हे दर महिन्याला अधिकारी घेणार आहेत. समजा, एखाद्या हॉटेलला दर्जा मिळाला पण; दोन-तीन वर्षांनंतर या हॉटेलमध्ये त्रुटी आढळल्या तर त्यांच्यावर अन्न व सुरक्षा मानद कायदा २००६ नुसार निश्चित कारवाई करून त्यांचे हे मानांकन रद्द करण्यात येईल, असे विभागाने सांगितले.
अशी राहणार प्रक्रिया
हॉटेल मालकाचे आॅनलाईन रजिस्टर होईल. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यामार्फत हॉटेलची तपासणी करतील. या तपासणीअंती हॉटेलच्या दर्जाचे (उदा.‘अ’, ‘ब’,‘क’, ‘ड’) मानांकन त्यांना मिळेल. त्याची नोंद केंद्र सरकारच्या अन्न व औषध विभागाकडे राहणार आहे. त्याचा फायदा देशभरातील पर्यटकांसह ग्राहकांना होणार आहे. हे मानांकन हॉटेलमधील दर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे.

परवाना फलक दर्शनीजवळ लावला पाहिजे.
मोफत पिण्याचे पाणी द्यावे.
कामगारांची वर्षातून दोनवेळा वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे.
कामगारांनी हातमोजे व अ‍ॅपरल घालणे.
कामगारांनी तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नये, त्यांनी नीटनिटके राहावे.
पाणी साठवण्याची टाकी दर महिन्याला स्वच्छ करावी. ती निर्जंतुक केली पाहिजे.
किचन पेस्ट करणे (उदा. झुरळ, मुंग्या, उंदीर, पालींचा बंदोबस्त करणे, त्यांचा वावर स्वयंपाकघरात असता कामा नये)
मालाची तारीख लिहून ठेवणे गरजेचे आहे.
विविध प्रकारचे मसाले, कडधान्ये, तेल आदी एक्सायरी डेट झालेले माल वापरात घेऊ नयेत.
प्रत्येक मालाचे बिल असले पाहिजे, तो माल परवानाधारकाकडूनच घेतला पाहिजे.
हॉटेलचे मेन्यू कार्ड असणे गरजेचे.

Web Title: Hotel cleanliness on 'cleanliness'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.