हुपरी क्राईम बातमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:03+5:302021-01-08T05:22:03+5:30
हुपरी क्राईम बातमी हुपरी : राष्ट्रपुरुषाबद्दल सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर व छायाचित्र प्रसारित करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा ...

हुपरी क्राईम बातमी
हुपरी क्राईम बातमी
हुपरी : राष्ट्रपुरुषाबद्दल सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर व छायाचित्र प्रसारित करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील एका तथाकथित पत्रकारावर मंगळवारी अटकेची कारवाई करण्यात आली. प्रवीण घाडगे (वय ३५, रा. मूळगाव बुधगाव, जिल्हा सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याला प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपुरुषाबद्दल अवमानकारक लिखाण करणाऱ्या समाजकंटकावर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन दलित समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना दिले.
कुरुंदवाड(ता. शिरोळ) येथे सोशल मीडियावरील न्यूज चॅनेल कार्यरत आहे.