शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

होनेवाडी ग्रामपंचायतीची सलग पाचव्यांदा निवडणूक बिनविरोध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 12:37 IST

gram panchayat Elecation- आजरा तालुक्यातील होनेवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध होणार आहे. ग्रामस्थांनी निवडणूकऐवजी गावच्या विकासासाठी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. सुकाणू समितीने दिलेल्या निर्णयाप्रमाणे फक्त सात जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करणेत आले.

ठळक मुद्देहोनेवाडी ग्रामपंचायतीची सलग पाचव्यांदा निवडणूक बिनविरोध होणार बिनविरोधची परंपरा कायम ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

आजरा :आजरा तालुक्यातील होनेवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध होणार आहे. ग्रामस्थांनी निवडणूकऐवजी गावच्या विकासासाठी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. सुकाणू समितीने दिलेल्या निर्णयाप्रमाणे फक्त सात जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करणेत आले.सरकारी लाभाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबविलेले होनेवाडी गाव. १९९५ मध्ये आदर्श ग्राम योजना, तंटामुक्त अभियान व तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याहस्ते निर्मलग्राम पुरस्कार मिळवून तालुक्यात आदर्श असलेले होनेवाडी गावचा उल्लेख प्रशासन पातळीवर केला जातो. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोणताही वादंग नाही.एकोपा ठेवून समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेणेत आला. प्रत्येक प्रभागानुसार सुकाणू समिती नेमण्यात आली. सुकाणू समितीचे सदस्य जाणकार व उमेदवारीची इच्छा नसणारे निवडण्यात आले.सुकाणू समितीने प्रभागातील सदस्यांची बैठक घेतली. इच्छुकांची नोंदणी करून घेतली. मुलाखती घेतल्या त्यातून उमेदवारांची नावे निवडणेत आली. उमेदवारांचे अर्ज फक्त सात जणांचे भरण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे आज सात जणांनी भरण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे आज सात जणांनी येवून अर्ज दाखल केले. उमेदवारी न मिळालेल्या व्यक्तींनी नाराज न होता गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे.होनेवाडीची मतदारसंख्या ७५० असून प्रत्येक प्रभागात २५० ते २७० मतदार आहेत. प्रभाग १ व ३ मध्ये सर्वसाधारण पुरूष व सर्वसाधारण महिला तर प्रभाग दोनमध्ये इतर मागास पुरूष, सर्वसाधारण महिला व इतर मागास महिला असे आरक्षण आहे. यापूर्वी जनरल पुरूष व जनरल महिलेला सरपंचपदाची संधी मिळाली आहे. यावेळी सरपंचपदापेक्षा गावचा विकास केंद्रबिंदू मानून काम करण्याबाबत ग्रामस्थांचे एकमत झाले आहे.होनेवाडी ग्रामस्थांनी सलग पाचव्यांदा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून सर्व गावांसमोर आदर्श ठेवला आहे. निवडणुकीतून भांडण करण्यापेक्षा ग्रामस्थांचा एकोपा झालेस विकासकामे करणे शक्य आहे. जाणकार व समाजकार्य करण्याची इच्छा असणाºया उमेदवारांना ग्रामस्थांनी संधी दिली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर