प्रामाणिकपणाबद्दल नेसरीतील तिघांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST2021-06-28T04:18:29+5:302021-06-28T04:18:29+5:30

येथील शिवराज मनोहर देसाई या युवकाचे कामावरून येताना ५ हजार रुपये मसणाई मंदिराशेजारी हरविले होते. तो मोटारसायकलवरून जात असल्याने ...

Honoring the three of Nesri for honesty | प्रामाणिकपणाबद्दल नेसरीतील तिघांचा सत्कार

प्रामाणिकपणाबद्दल नेसरीतील तिघांचा सत्कार

येथील शिवराज मनोहर देसाई या युवकाचे कामावरून येताना ५ हजार रुपये मसणाई मंदिराशेजारी हरविले होते. तो मोटारसायकलवरून जात असल्याने त्यांच्या ते लक्षात आले नाही. संबंधित रक्कम ही नजीर मालदार व प्रमोद मुरकुटे या दोन तरुणांना सापडली. त्यांनी प्रामाणिकपणे शिवराज देसाई या युवकाला परत दिले.

मलिग्रे-कागिनवाडी रस्त्यावर येथील व्यापारी बाळासाहेब हिडदुगी यांना किमती मोबाईल सापडला होता. त्यांनी तो शिप्पूर तर्फ नेसरी येथील नारायण पाटील यांना परत दिला. या प्रामाणिकपणाबद्दल संबंधित व्यक्तींचा राजर्षी शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंतीचे औचित्य साधून बाळासाहेब हिडदुगी, नजीर मालदार व प्रमोद मुरकुटे यांचा येथील शिवसेना शाखेतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी शहरप्रमुख प्रकाश मुरकुटे, विलास हल्याळी, सागर अत्याळी, विश्वनाथ रेळेकर, जमीर जलाली, जुबेर वाटंगी, प्रसाद हल्याळी, अनिकेत नाईक, भागेश पांडव, शिवराज देसाई उपस्थित होते.

Web Title: Honoring the three of Nesri for honesty