जयसिंगपूर रोटरीकडून शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:24 IST2021-09-27T04:24:37+5:302021-09-27T04:24:37+5:30
जयसिंगपूर : येथील रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीकडून नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यंकटेश ...

जयसिंगपूर रोटरीकडून शिक्षकांचा गौरव
जयसिंगपूर : येथील रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीकडून नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यंकटेश देशपांडे, किशोर लुल्ला यांच्या हस्ते शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी वीस गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडियल एज्युकेशन ॲपचे मोफत वितरण करण्यात आले. प्रारंभी स्वागत दादासो चौगुले यांनी, तर प्रास्ताविक सुदर्शन कदम यांनी केले. यावेळी आदर्श शिक्षक म्हणून संजय चिगरे, विनायक व्हावळ, आनंदराव शिंदे, शांतीकुमार हेमगिरे, विष्णू चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. यावेळी डिस्ट्रिक्ट फंडातून सरस्वती हायस्कूल टाकळीवाडीस हँडवाॅश बेसिन, राष्ट्रीय विद्यालय तमदलगेस कॉम्प्युटर व जनतारा हायस्कूलला ५५ स्मार्ट टीव्हीचे वितरण करण्यात आले. यावेळी अन्सार चौगुले याचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रुस्तुम मुजावर, भाऊसो नाईक, अविनाश पट्टणकुडे, विनोद घोडावत, राजेंद्र मालू, नंदू बलदवा, पी. के. कांबळे, राम बोंडगे उपस्थित होते. सूत्रसंचालन रेखा गायकवाड तर नरेंद्र पाटील यांनी आभार मानले.