उत्कृष्ट काम करणाऱ्या महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:17 IST2021-02-05T07:17:16+5:302021-02-05T07:17:16+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने प्रजासत्ताक दिनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ...

उत्कृष्ट काम करणाऱ्या महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने प्रजासत्ताक दिनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. झाडू कामगार तानाजी शिंदे, तानाजी वाकरेकर, हेमंत कांबळे, धनंजय कांबळे, अनिल चिंचवाडकर, दीपक पोवार, विनोद मोगले, संभाजी पाटोळे, शाहू बुचडे यांचा त्यामध्ये समावेश आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचा सन्मान करून त्यांचे मनोबल उंचावविण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते.
प्रशासक बलकवडे यांनी येथून पुढे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात येईल असे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती शिक्षण संवाद अधिकारी निलेश पोतदार व आरोग्य निरिक्षक विकास भोसले यांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रवींद्र आडसूळ, निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
फोटो क्रमांक - २७०१२०२१- केएमसी सत्कार
ओळ - कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.