पुरस्कारामुळे चांगल्या कार्यकर्त्यांचा सन्मान
By Admin | Updated: January 20, 2015 00:06 IST2015-01-19T23:10:09+5:302015-01-20T00:06:09+5:30
जयंत पाटील : बैरागदार यांना ‘आदर्श समाजसेवक’; रघुनाथ म्हेत्रे यांना ‘कृषिभूषण’ पुरस्कार प्रदान

पुरस्कारामुळे चांगल्या कार्यकर्त्यांचा सन्मान
जयसिंगपूर : समाजातील चांगल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचे प्रेरणादायी काम अॅड. मनोज पाटील पुरस्काराच्या माध्यमातून करीत आहेत. पुरस्कारामुळे चांगल्या कार्यकर्त्यांचा सन्मान होतो, असे प्रतिपादन माजी मंत्री जयंत पाटील यांनी केले.
नांदणी (ता. शिरोळ) येथे स्व. आपगोंडा पाटील यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शरद कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरागदारयांना ‘आदर्श समाजसेवक’ पुरस्कार, तर रघुनाथ म्हेत्रे यांना ‘नांदणी कृषिभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रारंभी बाबासो देसाई यांनी स्वागत, आण्णासो क्वाणे यांनी प्रास्ताविक, तर बबन यादव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संजय पाटील-यड्रावकर, चंगेजखान पठाण, अमरसिंह पाटील, शेखर पाटील, आण्णासो शंभुशेटे, उद्योगपती आण्णासाहेब चकोते, एन. डी. पाटील, रामगोंडा पाटील, पोपट बोरगावे, संजय बोरगावे, राजेश शंभुशेटे, बाळासो मगदूम,रूपेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बाबासाहेब बागडी यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)