जनता गृहतारण संस्थेतर्फे मान्यवरांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:23 IST2021-04-10T04:23:14+5:302021-04-10T04:23:14+5:30
येथील जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या गडहिंग्लज शाखेतर्फे डॉ. के. आर. पाटील व डॉ. संजीवनी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ...

जनता गृहतारण संस्थेतर्फे मान्यवरांचा सत्कार
येथील जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या गडहिंग्लज शाखेतर्फे डॉ. के. आर. पाटील व डॉ. संजीवनी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संस्थाध्यक्ष मारुती मोरे व आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एन. सादळे यांच्याहस्ते मान्यवरांचा सत्कार झाला.
नेसरी येथील तुकाराम कोलेकर महाविद्यालयातून डॉ. के.आर. पाटील हे प्राचार्यपदावरून सेवानिवृत्त झाले तर डॉ. संजीवनी पाटील यांनी पुणे विद्यापीठाची हिंदी विषयातील पी.एचडी पदवी संपादीत केली आहे. याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण चौगुले, पंडित पाटील, सुरेश डोंगरे, डॉ. अशोक बाचूळकर, शाखाधिकारी दिनेश पाटणे उपस्थित होते.
शाखाध्यक्ष प्रकाश पोवार यांनी स्वागत केले. विनायक चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. तुकाराम पोवार यांनी आभार मानले.
---------------------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथे डॉ. के. आर. पाटील व डॉ. संजीवनी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ए. एन. सादळे, बाळकृष्ण चौगुले, पंडित पाटील, अशोक बाचूळकर आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०९०४२०२१-गड-०१