कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी यंदा गृहपोलीस उपअधीक्षक सतीश बाळासाहेब माने व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक फौजदार मनोहर बसाप्पा खणगावकर ठरले. शनिवारी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही पदके जाहीर करण्यात आली.पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) व स्वातंत्र्यदिनाच्या (१५ आॅगस्ट) पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले जाते. सतीश माने हे मूळचे कागलचे. १९८३ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाले. त्यांनी आजअखेर सोलापूर (ग्रामीण), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली, सोलापूर शहर, सिंधुदुर्ग, पुणे रेल्वे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, राज्य गुप्तवार्ता विभाग कोल्हापूर, औरंगाबाद (ग्रामीण), उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड येथे सेवा बजावली आहे.
सध्या गृहपोलीस उपअधीक्षक (कोल्हापूर मुख्यालय) येथे आॅगस्ट २०१६ पासून कार्यरत आहेत. चार महिन्यांनी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांना ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये अत्यंत महत्त्वाची व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल २२४ बक्षिसे व प्रशस्तिपत्रके मिळाली आहेत. २०११ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक, मुंबई यांचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
रायटर म्हणून तपासणी कागदपत्रे तयार केली. यामुळे पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. कोवाड येथे सेवा बजावत असताना राजगोळी येथील प्रियकराने प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह बॅरेलमध्ये तीन महिने लपवून ठेवला होता. या खळबळजनक घटनेतील मुख आरोपी व त्याचे साथीदार पकडण्याची कामगिरी केली.
विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, कोल्हापूर येथे सेवेत असताना अशोक धिवरे यांनी त्यांना दोन वेळा अतिउत्कृ ष्ट सेवेचा शेरा देऊन त्यांच्या कामाची प्रशंसा केली. लाचलुचपत प्रतिबंध विभागात सेवा बजावत असताना १०० हून अधिक भ्रष्टाचारी लोकांना पकडणेकामी त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.
या कामगिरीसाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, शिरीष सरदेशपांडे, सारंग आवाड, संदीप दिवाण यांनी त्यांच्या कामगिरीसाठी उत्कृ ष्ट शेरा देऊन गौरविले आहे. त्यांच्या पोलीस सेवेतील जनसंपर्कामुळे चोरी, घरफोडी, खुनाचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांनी ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत अत्यंत महत्त्वाची व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल १२५ बक्षिसे व प्रशस्तिपत्रके मिळाली आहेत. २०१८ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक, मुंबई यांचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.फोटो : २५०१२०१९-कोल-सतीश मानेफोटो : २५०१२०१९-कोल-मनोहर खणगावकर----------------------------