घरफाळा घोटाळाप्रश्नी २० जुलैला आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:24+5:302021-07-14T04:27:24+5:30

कोल्हापूर : महापालिकेत उघड झालेल्या घरफाळा घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई करावी, घोटाळ्यातील चौकशीचा अंतिम अहवाल जाहीर करावा, या मागणीवर ...

Home tax scam issue agitation on 20th July | घरफाळा घोटाळाप्रश्नी २० जुलैला आंदोलन

घरफाळा घोटाळाप्रश्नी २० जुलैला आंदोलन

कोल्हापूर : महापालिकेत उघड झालेल्या घरफाळा घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई करावी, घोटाळ्यातील चौकशीचा अंतिम अहवाल जाहीर करावा, या मागणीवर सोमवारी महापालिका अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने २० जुलैला महापालिका चौकात आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा ‘ई’ वाॅर्ड लोककल्याण व संघर्ष समितीतर्फे देण्यात आला. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, करनिर्धारक विनायक औंधकर यांना हा इशारा देण्यात आला.

घरफाळा घोटाळा प्रकरणातील दोषींवरील कारवाईच्या पाठपुराव्यासाठी समितीच्या शिष्टमंडळाने अधिकारी देसाई आणि औंधकर यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळातर्फे विविध मागण्या करण्यात आल्या. २०२० मध्ये महापालिकेतील घरफाळा घोटाळा उघड झाला. त्याची व्याप्ती किती कोटींची आहे, हे जाहीर करावे. १९९६ पासून घरफाळा विभागाची १५५ प्रकरणे न्यायालयासमोर प्रलंबित आहेत. यास जबाबदार असणाऱ्यांची नावे जाहीर करावीत, १५५ प्रकरणात किती घरफाळा थकलेला आहे, तो जाहीर करावा. मालमत्तेसंबंधी खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर फौजदारी दाखल करावी, घरफाळा लागू न झालेली शहरातील घरे, प्लॅटसंबंधीची माहिती जनतेसमोर आणावी, या मागणीसंबंधीचे प्रश्न ॲड. बाबा इंदूलकर, अनिल कदम यांनी अधिकाऱ्यांना विचारले; पण यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे ॲड. इंदूलकर यांनी स्पष्ट केले. यावेळी दिलीप देसाई, अनिल घाटगे, ऋतुराज माने, महादेव पाटील, जीवन कदम आदी उपस्थित होते.

Web Title: Home tax scam issue agitation on 20th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.