शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

७४८ जागांसाठी होमगार्ड भरती, २० फेब्रुवारीला सदस्य नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 13:47 IST

कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी रिक्त असलेल्या ५५७ पुरुष व १९१ महिला अशा एकूण ७४८ जागांसाठी होमगार्ड भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारीला कसबा बावडा येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी सात वाजल्यापासून नवीन होमगार्ड सदस्य नावनोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे७४८ जागांसाठी होमगार्ड भरती, २० फेब्रुवारीला सदस्य नोंदणीउमेदवारांनी सहभागी व्हावे : अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे

कोल्हापूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी रिक्त असलेल्या ५५७ पुरुष व १९१ महिला अशा एकूण ७४८ जागांसाठी होमगार्ड भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारीला कसबा बावडा येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी सात वाजल्यापासून नवीन होमगार्ड सदस्य नावनोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्डचे अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी केले आहे.जिल्ह्यात निवडणुका, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव यांसह अनेक आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी होमगार्डना कर्तव्यावर पाचारण केले जाते. होमगार्ड बंदोबस्तांकरिता हजर होत नसतील, तर त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश महासमादेशक होमगार्ड यांनी दिले आहेत. त्यानुसार संवेदनशील व अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तांवर हजर राहण्यास टाळाटाळ करणाऱ्या होमगार्डवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

होमगार्ड गैरहजर राहिल्यामुळे बंदोबस्ताच्या मागणीप्रमाणे होमगार्डची पूर्तता होत नसल्याने जिल्ह्यातील ५५७ पुरुष व १९१ महिला होमगार्डची अनुशेष संख्या पूर्ण करण्याकरिता नवीन होतकरू उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे; त्यासाठी २० फेब्रुवारीला नवीन सदस्य नावनोंदणी कार्यक्रम आयोजित केला आहे.

उमेदवाराने गुणांक विवरणपत्र, शैक्षणिक अर्हता, रहिवासी पुरावा, कागदपत्र पडताळणी सूची, तांत्रिक गुण विवरणपत्र, निवेदन १ व २, आदी अर्ज स्वत:च्या हस्ताक्षरात भरून भरतीच्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे. उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल. होमगार्ड नोंदणी रिक्त जागांसंबंधी बदल व नोंदणी संदर्भातील सर्व अधिकार जिल्हा समादेशक यांनी राखून ठेवलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी सदस्य नोंदणीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक घाडगे यांनी केले आहे. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर