घरातील बुरशी आरोग्याला हानिकारक

By Admin | Updated: July 31, 2014 23:33 IST2014-07-31T21:08:11+5:302014-07-31T23:33:29+5:30

पावसाळ्यातील समस्या : वेळेवर उपाय आवश्यक

Home Fungus Harmful to Health | घरातील बुरशी आरोग्याला हानिकारक

घरातील बुरशी आरोग्याला हानिकारक

सातारा : गेल्या काही दिवसांत सलग पडणाऱ्या पावसामुळे अनेक घरांमध्ये ओल येण्याचे प्रकार घडू लागले आहेत. आले आल्यानंतर भिंतीवर येणारा बुरशीचा थर छोट्यांसह दमा रूग्णांना हानीकारक ठरू शकतो. म्हणूनच पाऊस येण्या अधीच यावर उपाय करणं आवश्यक असते.ज्या घरांचे आयुष्यमान जास्त आहे, दोन भिंतीमध्ये प्लास्टर करण्याची संधी नाही किंवा पाऊस पडण्याच्या दिशेला पाण्याला अटकाव करण्यासाठी झाड नसेल अशाच ठिकाणी भिंतींना ओल येते. भिंतीवर वाऱ्याच्या वेगाने धडकणाऱ्या पावसाचा त्याच त्याच ठिकाणी मार लागून भिंतीत ओल येते. किरकोळ प्रमाणात ओल येत असेल तर तीला अटकाव करण्यासाठी भिंतीवर प्लास्टिकचा कागद लावला जातो. पण मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या ओलीवर वॉटर प्रुफिंग हा एकच पर्याय राहतो.घरात येणाऱ्या ओलीमुळे घरातील वातावरण आणि वास यात फरक पडतो. दमट आणि कुबट वातावरणाचा परिणाम घरातील फर्निचरवरही दिसतो. फर्निचरच्या कुशनलाही याचा फटका बसतो. दमा रूग्ण आणि लहान मुलांसाठी हा वास खुपच घातक असतो. लहान मुलांचा चुकून भिंतीवर हात लागून बुरशी त्यांच्या हाताला लागली आणि ती पोटात गेली तर जुलाब आणि पोट दुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे लहान मुलांना या बुरशीपासून लांब ठेवणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)


--पाऊस सुरू झाल्यानंतर भिंतीतून येणारी ओल भिंतीत राहून त्यातून बुर्शी तयार होते. साधारण पांढरी आणि हिरव्या रंगाची भुरशी सामान्यपणे सर्वत्र पहायला मिळते. पण हिरवी आणि पिवळ्या रंगांची बुरशी आरोग्यासाठी खुपच धोकादायक असते. भिंतीच्या मध्यापासून ही बुरशी पसरत जाते. छोट्याशा टिपक्यापासून सुरू झालेली बुरशी दोन दिवसात भिंतभर वाढते. ही बुरशी आरोग्यासाठी हानीकारक असते.

वॉटर प्रुफिंगची चलती
--पश्चिमेकडून येणाऱ्या पावसामुळे अनेक घरांच्या पश्चिम बाजू कडिल भिंतींमध्ये मोठ्या प्रमाणावर ओल येते. या ओलीपासून सुटका मिळवायची असेल तर त्याची तजवीज उन्हाळत्यात करून घेणे गरजेचे असते. यासाठी भिंतीवर वॉटर प्रुफिंग करून घेणे उपयुक्त ठरते. पूर्ण भिंतीवर विशिष्ट रायसन मिश्रित रंग दिला जातो. हा रंग उन्हाच्या तडाक्यात वाळला तर भिंतीला ओल येण्याची भिती राहत नाही. विशेष म्हणजे प्रुफिंग करणारे हे काम केल्यानंतर त्याचे सुमारे तीन वर्षांची खात्री देतात. कितीही जोराचा पाऊस आला तरी पाणी येत नसल्यामुळे हा पर्याय उपयुक्त आहे.
४पावसाळ्याच्या दिवसात बुरशी होण्याचे प्रमाण सातारा शहरात कमी आहे. पण ज्या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तिथे ही समस्या अधिक जाणवते. यावर उपाय म्हणून कोणी प्लास्टिकचा कागद लावून भिंत झाकून घेते तर काही जण बुरशीचा दर्प घालविण्यासाठी पाहूणे येण्याआधी रूम फ्रेशनर मारून वातावरणातील हा वास घालविण्याचा प्रयत्न करतात. पण हा पर्याय अगदी तात्पुरता स्वरूपाचा असाच आहे.

Web Title: Home Fungus Harmful to Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.