साने गुरुजी वसाहतमध्ये सव्वाचार लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:10+5:302021-07-14T04:27:10+5:30

कोल्हापूर : येथील साने गुरुजी वसाहतमधील प्रवीण बाळकृष्ण रणदिवे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी सुमारे १२ तोळ्यांचे सोन्याचे ...

Home burglary of lakhs in Sane Guruji colony | साने गुरुजी वसाहतमध्ये सव्वाचार लाखांची घरफोडी

साने गुरुजी वसाहतमध्ये सव्वाचार लाखांची घरफोडी

कोल्हापूर : येथील साने गुरुजी वसाहतमधील प्रवीण बाळकृष्ण रणदिवे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी सुमारे १२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख ५२ हजारांची रोकड असा सुमारे सव्वाचार लाखांचा ऐवज लांबवला. त्यांच्या सासरेंचे निधन झाल्याने ते सहकुटुंब जिवबा नाना पार्कमध्ये गेले असता चोरट्यांनी डाव साधला. याप्रकरणी रणदिवे यांच्या फिर्यादीनुसार राजवाडा पोलिसांत चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साने गुरुजी वसाहत येथील लोकमान्य सोसायटीनजीक प्रवीण रणदिवे हे दांपत्य राहतात. त्यांचे सासरे जिवबा नाना जाधव पार्क येथे राहतात. रविवारी उपचारादरम्यान सासरेंचा मृत्यू झाल्याने ते घराला कुलूप लावून सहकुटुंब तिकडे गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा उचकटून प्रथम हॉलमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी प्रथम हॉलमधील लोखंडी तिजोरी फोडली. पण त्यामध्ये त्यांना काहीही सापडले नाही, त्यामुळे चोरट्यांनी आतील खोलीतील तिजोरी फोडून त्यातील साहित्य विस्कटले. त्या तिजोरीतील सुमारे १२ तोळे सोन्याचे दागिने आणि ५२ हजारांची रोकड चोरून नेले. सकाळी १० वाजता रणदिवे हे घरी परतले असता चोरीची घटना उघडकीस आली. याबाबत राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ठसे आणि श्वान पथकानेही घटनास्थळी तपासणी केली.

बनावट व चांदीचे दागिणे ठेवले

आतील खोलीतील लोखंडी तिजोरीत असणारी चांदीची भांडी तसेच काही बनावट सोन्याचे दागिणे चोरट्यांनी तिथेच ठेवून पलायन केले.

फोटो नं. १२०७२०२१-कोल-चोरी०१,०२

ओळ : कोल्हापूर शहरात साने गुरुजी वसाहतमधील प्रवीण रणदिवे यांच्या घरी चोरट्यांनी सोमवारी पहाटे सुमारे सव्वाचार लाखांची घरफोडी केली. चोरट्यांनी चोरी करताना घरातील विस्कटलेले साहित्य.

120721\12kol_7_12072021_5.jpg~120721\12kol_8_12072021_5.jpg

ओळ : कोल्हापूर शहरात सानेगुरुजी वसाहतमधील प्रविण रणदिवे यांच्या घरी चोरट्यांनी सोमवारी पहाटे सुमारे सव्वाचार लाखांची घरफोडी केली, चोरट्यांनी चोरी करताना घरातील विस्कटलेले साहीत्य.~ओळ : कोल्हापूर शहरात सानेगुरुजी वसाहतमधील प्रविण रणदिवे यांच्या घरी चोरट्यांनी सोमवारी पहाटे सुमारे सव्वाचार लाखांची घरफोडी केली, चोरट्यांनी चोरी करताना घरातील विस्कटलेले साहीत्य.

Web Title: Home burglary of lakhs in Sane Guruji colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.