शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

पवित्र रमजान रोजे उद्यापासून, हिलाल कमिटीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 4:32 PM

चंद्र दर्शनाची साक्ष न मिळाल्याने मुस्लिम बांधवांचे रमजान रोजे उद्या, मंगळवारपासून सुरू होत आहेत. सायंकाळी झालेल्या मगरीब नमाजानंतर मुस्लिम बोर्डिंगमध्ये झालेल्या हिलाल कमिटी (चांद कमिटी)च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देपवित्र रमजान रोजे उद्यापासून, हिलाल कमिटीचा निर्णयमहिन्यातील २१, २५ व २७ वा रोजा महत्त्वाचा

कोल्हापूर : चंद्र दर्शनाची साक्ष न मिळाल्याने मुस्लिम बांधवांचे रमजान रोजे उद्या, मंगळवारपासून सुरू होत आहेत. सायंकाळी झालेल्या मगरीब नमाजानंतर मुस्लिम बोर्डिंगमध्ये झालेल्या हिलाल कमिटी (चांद कमिटी)च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.मन्सूर आलम कासमी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैेठकीत मुंबई, बंगलोर, लखनौ, दिल्ली, देवबंद, रत्नागिरी, रायगड इंडी, तसेच अन्य शहरांशी संपर्क साधण्यात आला. या ठिकाणांहून चंद्रदर्शनाची साक्ष न मिळाल्याने मंगळवारपासून रमजान रोजे सुरू होत असल्याचा निर्णय उलमा कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूर आलम कासमी यांनी जाहीर केला.यावेळी मौलाना इरफान कासमी, मुबीन बागवान, अब्दुलराजिक सिद्दीकी, नाझिम पठाण, अब्दुल रऊफ नाईकवडे, अब्दुलसलाम कासमी, बशिर नायकवडी, अब्दुलवाहीदी सिद्दीकी, हाफीज रफीक सनदी, आमीन अथणीकर, मुफ्ती ताहीर बागवान, राहमतुल्ला कोकणे, हाफीज फजलेकरीम शेख, रईस कासमी, तसेच कोल्हापूर शहर व उपनगरातील सर्व मसजिदचे पेशइमाम, मुस्लिम बोर्डिंगचे सर्व पदाधिकारी संचालक व अन्य मान्यवर उपस्थित होते.मुस्लिम धर्मात रमजान महिन्याला विशेष महत्त्व असून, या कालावधीत मुस्लिम बांधवांकडून कडक उपवास केला जातो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण हा उपवास करतात. या महिन्यातील २१, २५ व २७ वा रोजा महत्त्वाचा असतो. महिनाभर सायंकाळी मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करून उपवास सोडला जातो.

रमजान ईददिवशी हा उपवास सोडला जातो. यानिमित्त बाजारपेठेत उपवासाचे पदार्थ, खजूर, केळी, शीरखुर्मासाठीच्या शेवयांसह गोडपदार्थांची तसेच सुकामेव्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. मुस्लिम कुटुंबांमध्ये रोजांची तयारी सुरू झाली आहे. रमजान महिन्यात दानधर्म करणे पुण्याचे कर्म समजले जाते; त्यामुळे गरीब, गरजू व्यक्ती अथवा नातेवाईकांना मदत किंवा दानधर्म करण्याची प्रथा आहे. 

 

टॅग्स :Ramadanरमजानkolhapurकोल्हापूर