होळकर नगरात दाम्पत्यास लोखंडी रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:24 IST2021-04-07T04:24:11+5:302021-04-07T04:24:11+5:30

कोल्हापूर : किरकोळ कारणावरुन चिडून दाम्पत्यास लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन घरावर हल्ला करुन नुकसान केल्याचा प्रकार ...

In Holkar, a couple was beaten with an iron rod | होळकर नगरात दाम्पत्यास लोखंडी रॉडने मारहाण

होळकर नगरात दाम्पत्यास लोखंडी रॉडने मारहाण

कोल्हापूर : किरकोळ कारणावरुन चिडून दाम्पत्यास लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन घरावर हल्ला करुन नुकसान केल्याचा प्रकार फुलेवाडी रिंगरोडवर ब्रोंद्रेनगर नजीक अहिल्याबाई होळकर नगरात घडला. राजेंद्र हरिश्चंद्र राख (वय ५०) त्याची पत्नी बबीता राख (४६ दोघेही रा. अहिल्याबाई होळकर नगर) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा नोंदवला असून आशितोष विकास चाबूक (वय २८ रा. बाळूमामा तालीम मंडळनजीक, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) याला अटक केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फुलेवाडी रिंगरोडवर अहिल्याबाई होळकर नगरात राजेंद्र राख व विशाल जगताप हे शेजारी राहतात. राजेंद्र हे घरात असताना समोरील घरातील विशाल यांच्या घरातील होमथेटरचा आवाज कमी करा असे राजेंद्र याने सांगितले. या रागातून विशाल याच्यासह एकूण सहा जणांनी राजेंद्र व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत आशितोष चाबूक याला सोमवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. तर इतर पाचजणांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यानंतर हल्लेखोरांनी घराच्या काचा फोडून साहित्याची तसेच दारातील दुचाकीची ही मोडतोड केली. जखमी दाम्पत्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत जुना राजवाडा पोलिसात तक्रार नोंद झाली आहे.

--------------

Web Title: In Holkar, a couple was beaten with an iron rod