आजरा परिसरात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST2021-03-30T04:14:28+5:302021-03-30T04:14:28+5:30

आजरा शहरातील प्रत्येक चौकात मोठ्या प्रमाणात लाकूड जाळून होळी साजरी करण्यात आली. रवळनाथ मंदिरासमोरील होळी पेटविल्यानंतर गावातील सर्वच ठिकाणच्या ...

Holi is traditionally celebrated in Ajra area | आजरा परिसरात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा

आजरा परिसरात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा

आजरा शहरातील प्रत्येक चौकात मोठ्या प्रमाणात लाकूड जाळून होळी साजरी करण्यात आली. रवळनाथ मंदिरासमोरील होळी पेटविल्यानंतर गावातील सर्वच ठिकाणच्या होळ्या पेटविण्यात आल्या. कोरोनाचे सावट असल्याने तरुणाईमध्ये उत्साह दिसून आला नाही.

आजरा वगळता ग्रामीण भागात आज धुलिवंदन व रंगपंचमीही साजरी झाली. ग्रामीण भागात होळीसाठी बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला होता.

आजरा शहरातील रंगपंचमी गुढीपाडव्याच्या अगोदरच्यादिवशी साजरी केली जाते.

-----------------

* होळीने पर्यावरणाबरोबर रस्त्याचीही हानी

आजरा शहरात सर्वच चौकांमध्ये लाकडांच्या होळ्या पेटविण्यात आल्या. ज्या ठिकाणी होळी पेटविण्यात आली, त्याठिकाणचे डांबर व रस्ता खराब झाला आहे. मंडळांनी होळीच्या ठिकाणी माती टाकून त्यावर होळी पेटविली असती, तर चौकातील रस्ते सुस्थितीत राहिले असते.

* फोटो ओळी : आजरा शहरात लाकडांची पेटविलेली होळी व त्याभोवती शंखध्वनी करीत फिरणारे युवक.

क्रमांक : २९०३२०२१-गड-०७

Web Title: Holi is traditionally celebrated in Ajra area