केशरी व पिवळ्या शिधापत्रिका धारकांना दरमहा नियमित धान्य मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST2021-09-09T04:29:27+5:302021-09-09T04:29:27+5:30
निवेदनात म्हटले आहे की, सन २०१३ नंतरच्या केशरी व पिवळ्या शिधापत्रिका धारकांना ऑनलाईन लिंकिंग झाले नसल्याच्या कारणास्तव दरमहा कुटुंबातील ...

केशरी व पिवळ्या शिधापत्रिका धारकांना दरमहा नियमित धान्य मिळावे
निवेदनात म्हटले आहे की, सन २०१३ नंतरच्या केशरी व पिवळ्या शिधापत्रिका धारकांना ऑनलाईन लिंकिंग झाले नसल्याच्या कारणास्तव दरमहा कुटुंबातील सदस्य संख्येप्रमाणे धान्य मिळत नाही. शिवाय केशरी व पिवळ्या शिधापत्रिका धारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसल्याने संबंधित शिधापत्रिकाधारक वंचित राहत आहेत. संबंधित सर्व शिधापत्रिका धारकांना धान्य मिळावे, या मागणीचा विचार व्हावा, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा हातकणंगले तालुका रेशनिंग कृती समितीच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर कृती समितीचे अध्यक्ष अजितकुमार देवमोरे तसेच अन्य सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी अमरजित बंडगर, त्रिगुण पांडव, मोहसीन सुतार, बंडा पुजारी, किरण कांबळे, रावसाहेब निर्मळे उपस्थित होते.