आरोपीला पकडा, सहनशीलता पाहू नका -उद्या गडहिंग्लजला मोर्चा

By Admin | Updated: July 30, 2014 00:42 IST2014-07-30T00:13:11+5:302014-07-30T00:42:42+5:30

चंद्रकांत पाटील : ‘बसर्गे’प्रकरणी पोलीस उपअधीक्षकांची घेतली भेट

Hold the accused, do not look tolerant - Front of the ganghangel | आरोपीला पकडा, सहनशीलता पाहू नका -उद्या गडहिंग्लजला मोर्चा

आरोपीला पकडा, सहनशीलता पाहू नका -उद्या गडहिंग्लजला मोर्चा

गडहिंग्लज : बसर्गेच्या तरुणीवरील बलात्काराच्या घटनेला १५ दिवस उलटून गेले तरीही आरोपी सापडत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. गडहिंग्लजसारख्या ग्रामीण भागात अशा घटना पुन्हा घडू नयेत याची दक्षता घ्या. जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, चार दिवसांत आरोपीला पकडा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला.
बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी येथील पोलीस उपअधीक्षक सागर पाटील यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी पोलीस निरीक्षक रामदास इंगवले उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, मोठ्या शहरात घडणाऱ्या अशा घटना ग्रामीण भागात घडत आहेत ही गंभीर बाब आहे. जनतेच्या संरक्षणाची व सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांवर आहे. बसर्गेच्या घटनेतील आरोपी सापडला नाही तर लोकांचा पोलिसांवरील विश्वास उडेल. यावेळी पाटील व इंगवले यांनी तपासाबद्दल माहिती दिली. बसर्गे प्रकरणाच्या तपासासाठी चार विशेष पथके नेमली असून, सर्व स्तरावर कसून चौकशी सुरू आहे. मोर्चे, आंदोलन न करता माहिती देण्यासाठी लोकांनीही पुढे यावे. पोलिसांना वेळ द्यावा. निश्चितपणे या प्रकरणाचा छडा लावला जाईल. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मारुती राक्षे, सरचिटणीस अनिल खोत, प्रा. सुनील शिंत्रे, प्रा. टी. एम. राजाराम, प्रा. अमृतराव देसाई, मार्तंड जरळी, प्रीतम कापसे, आनंद पेडणेकर, सुरेश काळगे, बाळू दोरूगडे, मनीष हावळ, विजय मगदूम, बसवराज कंकणवाडी, रणजित कुडाळकर, शिवकृष्ण ढंगे, आदीं उपस्थित होते.

Web Title: Hold the accused, do not look tolerant - Front of the ganghangel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.