भारतीय कुस्तीच्या इतिहासाच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:47+5:302021-06-17T04:17:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भारतीय कुस्तीला मोठा इतिहास आहे. त्यातील बारकावे पैलवान शंकरराव पुजारी यांनी आयुष्यभर जपले. समालोचनाच्या ...

History of Indian Wrestling | भारतीय कुस्तीच्या इतिहासाच्या

भारतीय कुस्तीच्या इतिहासाच्या

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : भारतीय कुस्तीला मोठा इतिहास आहे. त्यातील बारकावे पैलवान शंकरराव पुजारी यांनी आयुष्यभर जपले. समालोचनाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवले. आज पुस्तकाच्या रूपात त्याचे संकलन करून एक ऐतिहासिक ऐवज तयार झाला आहे. हे मोठे काम आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

ज्येष्ठ कुस्ती समालोचक पैलवान शंकरराव पुजारी यांच्या ‘भारतीय कुस्ती - इतिहास आणि परंपरा’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. मुंबई येथील पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हा कार्यक्रम झाला.

यावेळी लेखक पैलवान शंकरराव पुजारी, राष्ट्रीय तालीम संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, तेजस प्रकाशनचे प्रमुख रावसाहेब पुजारी, शिरोळच्या पसायदानचे संचालक संजीव पुजारी, रविकिरण ढवळे आदी उपस्थित होते.

फोटो १६०६२०२१- कोल- पुस्तक प्रकाशन

मुंबईत बुधवारी ‘भारतीय कुस्ती - इतिहास आणि परंपरा’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी संजीव पुजारी, रावसाहेब पुजारी, पैलवान शंकरराव पुजारी, व्ही. बी. पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: History of Indian Wrestling