चिंचवाड येथे इतिहास संशोधक डॉ. पाटील यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST2021-01-17T04:21:18+5:302021-01-17T04:21:18+5:30
गांधीनगर : ...

चिंचवाड येथे इतिहास संशोधक डॉ. पाटील यांचा गौरव
गांधीनगर : सृजनशक्ती श्रमिक फाऊंडेशन कोल्हापूरचे सृजनशक्ती साहित्य विचार मंच आयोजित सृजनरत्न साहित्यिक डॉ. रावसाहेब पाटील गौरव समारंभ सोहळा व गौरव विशेषांक प्रकाशन समारंभ रविवार, दि. 17 जानेवारी रोजी मराठी शाळेच्या पटांगणात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 9 वाजता संपन्न होणार आहे. यावेळी आ. ऋतुराज पाटील यांची उपस्थिती असणार आहे. चिंचवाड गावचे सुपुत्र व सोलापूर निवासी ज्येष्ठ साहित्यिक, संपादक, पत्रकार, इतिहास संशोधक डॉ. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेच्या वतीने सोलापूर येथे मार्चमध्ये होणाऱ्या रौप्यमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. म्हणून सृजन परिवार, सन्मित्र स्पोर्ट्स, चिंचवाड व चिंचवाड हायस्कूल चिंचवाड व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने हा गौरव सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्त ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गृहराज्यमंत्री मा. ना. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील लाभले आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे हे असून प्रमुख अतिथी मा. आ. ऋतुराज पाटील हे आहेत. या कार्यक्रमासाठी नामवंत साहित्यिक प्राचार्य श्रीधर हेरवाडे, शाहीर कुंतिनाथ करके, कवयित्री नीलम माणगावे, कविश्री विजय बेळंके, विजय आवटी, प्रा. डी. ए. पाटील, सरपंच सुदर्शन उपाध्ये, डॉ. महावीर अक्कोळे, अण्णासाहेब ठिकणे, सिद्धोजीराव रणनवरे (बाबा सरकार), सुभाष पाटील, प्रकाश पाटील, सुरेश रोटे, दीपक मगदूम हे उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन सृजनशक्ती श्रमिक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील, सचिव नयना पाटील, समन्वयक उमेश सुतार, मुख्याध्यापक श्रेणिक पाटील हे करीत आहेत.