हिरण्यकेशी फौंडेशन ‘जीपीएल’चा मानकरी
By Admin | Updated: May 25, 2015 00:46 IST2015-05-23T00:46:00+5:302015-05-25T00:46:00+5:30
अंतिम सामन्याचे उद्घाटन उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांच्या हस्ते झाले. विजेत्या संघास संत गजानन शिक्षण समूहाचे विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण व प्रमोद पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

हिरण्यकेशी फौंडेशन ‘जीपीएल’चा मानकरी
गडहिंग्लज : गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन व महागावच्या संत गजानन शिक्षण समूहातर्फे आयोजित गडहिंग्लज प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात हिरण्यकेशी फौंडेशनने सूर्या होंडा रायडर्स संघाचा ३-० ने पराभव करून एकतर्फी सामना जिंकून ‘जीपीएल’चा मानकरी ठरला. ‘हिरण्यकेशी’चा कर्णधार संदीप गोंधळी हा स्पर्धेचा मानकरी ठरला.
अंतिम सामन्यात ‘हिरण्यकेशी’च्या प्रथमेश धबालेने १३ व्या मिनिटाला फ्री किकद्वारे दिलेल्या पासवर बालगंगाधरने मैदानी गोल केला. उत्तरार्धात ‘हिरण्यकेशी’च्या बालगंगाधरने पुन्हा मैदानी गोल केला. सामना संपण्यास १० मिनिटे शिल्लक असताना दिग्विजय सुतारने संघाचा तिसरा गोल करून संघाला ३-० ने विजय मिळवून दिला. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीत साई प्लाझा वॉरियर्सने जयवरद स्पोर्टस्चा २-० ने पराभव केला. मित्रत्वाच्या सामन्यात कोल्हापूरच्या बालगोपाल तालीम मंडळाने गडहिंग्लज युनायटेडचा २-१ने पराभव केला.
अंतिम सामन्याचे उद्घाटन उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांच्या हस्ते झाले. विजेत्या संघास संत गजानन शिक्षण समूहाचे विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण व प्रमोद पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
यावेळी सुनील चौगुले, संभाजी शिवारे, संदीप कोळकी, अजिंक्य चव्हाण, आयुबखान पठाण, विजय शिवबुगडे, सागर पोवार, अनुप घाटगे उपस्थित होते. दीपक कुपन्नावर यांनी स्वागत केले. ललित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. भैरू सलवादे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
सोहेल शेख (साई प्लाझा), प्रथमेश धबाले, दिग्विजय सुतार, बालगंगाधर (हिरण्यकेशी), राहुल पाटील (जयवरद)