शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह जिहादविरोधात कोल्हापुरातील इचलकरंजीत हिंदू जनआक्रोश मोर्चा; सरकारने जागे व्हावे, अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 14:25 IST

आबालवृद्धांसह महिला व युवतींचा मोठा सहभाग

इचलकरंजी : लव्ह जिहादविरोधी कायदा करावा, या मागणीसाठी रविवारी हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चात आबालवृद्धांसह महिला व युवती हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या. आता सरकारने जागे व्हावे; अन्यथा हिंदूंनी निर्णय घेतल्यास तेव्हा हस्तक्षेप करू नये, असा इशारा बजरंग दलाचे सहसंयोजक नितीन महाजन (पुणे) यांनी दिला.शहरातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून लव्ह जिहादविरोधीहिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरूवात झाली. भगवे ध्वज, भगव्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते श्रीरामाचा जयघोष करीत होते. विविध मागण्यांचे फलक व अखंड घोषणा देत मुख्य मार्गांवरून मोर्चा महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहचला. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी महाजन म्हणाले, हिंदूंनो अजूनही वेळ गेली नाही, जागे व्हा.  आपली एकत्र कुटुंब पद्धती मोडली आहे, नाती तुटली आहेत. त्यामुळे आपणच कामाच्या व्यापातून थोडे लक्ष द्या. आपल्या मुलींचे मित्र बना. परधर्मातील व्यक्तीशी मैत्री होऊ नये, याची काळजी घ्या.आशुतोष झा (बिहार) यांनी, प्रेम करणं गुन्हा नाही. परंतु ते कुणावर करावं हा गुन्हा आहे. महाविद्यालयातील मुले-मुली आणि सोशल मीडिया या जिहादला कारणीभूत ठरत आहेत. पालकांनी त्यावरही लक्ष द्यावे. राजकीय नेते वेगवेगळ्या पदांवर पोहचतात. छत्रपतींचे राजकारणासाठी नाव घेतात, परंतु धर्म विसरतात. आपणच धर्माचे व माता-भगिनींचे रक्षण करा. धर्म व राष्टÑ हितासाठी नेहमी जागरूक रहा, असे आवाहन केले.मोर्चामध्ये गजानन महाजन (गुरूजी), आमदार प्रकाश आवाडे, जवाहर छाबडा, विहिंप, बजरंग दल व विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वारकरी संप्रदायातील संत, तसेच तृतीयपंथीही सहभागी झाले होते.  मोठा पोलिस बंदोबस्तमोठ्या संख्येने निघालेल्या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, उपअधीक्षक, गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्यासह सुमारे ६०० पोलिसांचा फौजफाटा ठिकठिकाणी तैनात केला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLove Jihadलव्ह जिहादHinduहिंदू