निम्म्या गावांत महिलाराज; इच्छुकांची निराशा

By Admin | Updated: May 27, 2015 00:57 IST2015-05-27T00:43:23+5:302015-05-27T00:57:47+5:30

सरपंचपदाची आरक्षण सोडत : जिल्ह्यातील १0३0 ग्रामपंचायतींचा समावेश; मोर्चेबांधणी सुरू

Himalayan village, Mahilaraj; The disappointment of the seekers | निम्म्या गावांत महिलाराज; इच्छुकांची निराशा

निम्म्या गावांत महिलाराज; इच्छुकांची निराशा

कोल्हापूर : जिल्ह्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवारी तालुक्यातील तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती कार्यालय येथे पार पडली. हे आरक्षण २०१५-२०२० साठी काढण्यात आले. जिल्ह्यातील १०३० ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जातीसाठी १३९, अनुसूचित जातीसाठी ९, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २७८ व खुल्या प्रवर्गासाठी ६0४ अशा प्रकारे प्रवर्गनिहाय सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. तसेच वरील एकूण प्रवर्गांतील ५0 टक्के महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले. ज्या ठिकाणी पुरुष आरक्षण अपेक्षित होते तिथे महिला आरक्षण पडल्याने सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेकांची घोर निराशा झाली.
करवीर तालुक्यात ५९ जागांवर महिलाराज
कसबा बावडा : करवीर तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी जाहीर झाले. आरक्षण पुढीलप्रमाणे सरपंचपदासाठी :- अनुसूचित जाती (१० पदे) : चिंचवडे तर्फ कळे, हिरवडे दुमाला, हालसवडे, शिंगणापूर, भाटणवाडी, मुडशिंगी, सांगवडे, केर्ली, आरळे, भुये. अनुसूचित जाती महिला (९ पदे) :- सादळे-मादळे, शिरोली दुमाला, कोगील खुर्द, गर्जन, नंदवाळ, कळंबे तर्फ कळे, सडोली दुमाला, जैताळ, हळदी.
अनुसूचित जमाती महिला (१ पद) : उचगाव. नागरिकांचा मागास प्रवर्ग (१६ पदे) : वाकरे, आंबेवाडी, दऱ्याचे वडगाव, वडकशिवाले, कावणे, निगवे खालसा, देवाळे, कांचनवाडी, बहिरेश्वर, घानवडे, चिंचवाड, वाडीपीर, निगवे दुमाला, कोगे, कोथळी, केकतवाडी. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (१६ पदे) : हणमंतवाडी, मोरेवाडी, दिंडनेर्ली, आरे, खांटागळे, कुरुकली, बाचणी, वाशी, दोनवडे, नंदगाव, सडोली खालसा, कोपार्डे, सांगवडेवाडी, येवती, पाडळी बुद्रुक, चुये.
सर्वसाधारण महिला खुला आरक्षण (३३ पदे) : हणबरवाडी, इस्पुर्ली, पासार्डे, गांधीनगर, महे, नागाव, परिते, रजपूतवाडी, पाडळीखुर्द, गिरगाव, उजळाईवाडी, चिखली, म्हालसवडे, बालिंगे, नागदेववाडी, म्हाळुंगे, सावर्डे दुमाला, मांडरे, चाफोडी, हिरवडे खालसा, केर्ले, शिंदेवाडी, पडवळवाढी, सावरवाडी, खेबवडे, कणेरीवाडी, कंदलगाव, तेरसवाडी, कणेरी, वरणगे, भुयेवाडी, आडूर.
सर्वसाधारण खुला पुरुष प्रवर्ग (३३ पदे) : वसगडे, कसबा बीड, गोकुळ शिरगाव, भामटे, खुपिरे, शिये, उपवडे, बोलोली, कुडित्रे, हसूर दुमाला, कुर्डू, कोगील बुद्रुक, म्हारूळ, वडणगे, पाटेकरवाडी, आमशी, निटवडे, जठारवाडी, नेर्ली, शेळकेवाडी, बेले, गाडेगोंडवाडी, सरनोबतवाडी, वळिवडे, सांगरूळ, धोंडेवाडी, पाचगाव, गणेशवाडी, साबळेवाडी, तामगाव, सोनाळी, न्यू वाडदे, कळंबे तर्फ ठाणे.
गडहिंग्लज तालुक्यातील निम्म्या गावांत ‘महिलाराज’
गडहिंग्लज : तालुक्यातील ८९ पैकी ४४ गावांतील सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झाले. खुल्या गटातील महिला सरपंचपदासाठी आरक्षित २७ गावे अशी - बेळगुंदी, कानडेवाडी, नंदनवाड, शिप्पूर तर्फ आजरा, तेगिनहाळ, वाघराळी, हिटणी, हिरलगे, जरळी, खणदाळ, मुत्नाळ, तळेवाडी, बेकनाळ, औरनाळ, चिंचेवाडी, नरेवाडी, वडरगे, हडलगे, बुगडीकट्टी, मनवाड, नौकुड, हरळी खुर्द, खमलेहट्टी, निलजी, हसूरसासगिरी, महागाव, लिंगनूर तर्फ नेसरी.
इतर मागास महिला सरपंचपदासाठी आरक्षित १२ गावे अशी - इंचनाळ, जांभुळवाडी, मुंगूरवाडी, सावतवाडी तर्फ नेसरी, तेरणी, हसूरचंपू, हरळी बुद्रुक, कडलगे, कौलगे, तारेवाडी, वैरागवाडी, अत्याळ.
अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित ५ गावे अशी - काळमवाडी, नांगनूर, दुंडगे, कवळिकट्टे, इदरगुच्ची.
सर्वसाधारण गटासाठी आरक्षित २७ गावे अशी - नूल, हनिमनाळ, हणमंतवाडी, सरोळी, जखेवाडी, तावरेवाडी, शिंदेवाडी, यमेहट्टी, दुग्गुनवाडी, कडगाव, बिद्रेवाडी, हसूरवाडी, गिजवणे, उंबरवाडी, भडगाव, चन्नेकुप्पी, शिप्पूर तर्फ नेसरी, तुप्पूरवाडी, डोणेवाडी, हलकर्णी, नेसरी, तनवडी, माद्याळ, हिडदुग्गी, बटकणंगले, ऐनापूर, हेब्बाळ-जलद्याळ.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित १२ गावे - अरळगुंडी, लिंगनूर, काा नूल, मांगनूर तर्फ सावतवाडी, मासेवाडी, शेंद्री, बड्याचीवाडी, करंबळी, कुमरी, मुगळी, येणेचवंडी, अर्जुनवाडी, सांबरे.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित ५ गावे अशी - हेब्बाळ कसबा नूल, चंदनकूड, कुंबळहाळ, कडाल, हुनगिनहाळ. अनुसूचित जमातीसाठी आरक्षित गाव - बसर्गे बुद्रुक.
राधानगरी तालुक्यात ४९ सरपंचपदे महिला आरक्षित
राधानगरी : राधानगरी तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी सोडत पद्धतीने काढण्यात आले
खुल्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आडोली, अर्जुनवाडा, बुजवडे, चांदेकरवाडी, मोघर्डे, सोळांकूर, तारळे खुर्द, तिटवे, वाघवडे, चांदे, गुडाळ, गुडाळवाडी, सिरसे, आमजाई व्हरवडे, खिंडी व्हरवडे, मालवे, पिरळ/सावर्धन, पंडेवाडी, ओलवण, केळोशी बुद्रुक, घुडेवाडी, धामणवाडी, पडसाळी, पाटपन्हाळा, बुरंबाळी, शेळेवाडी, आकनूर, हासुर्ली, आवळी बुद्रुक आणि राजापूर, तर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आपराळ, बारडवाडी, चंद्रे, कांबळवाडी, खामकरवाडी, पडळी, पालकरवाडी, पनोरी, पिंपळवाडी, राधानगरी, शिरगाव, तुरंबे, येळवडे, कपिलेश्वर, गवशी, कौलव, आवळी खुर्द, कोनोली तर्फ असंडोली, कोडवडे, न्यू करंजे, तळगाव, सरवडे, कोते, मांगोली, रामणवाडी, हसणे, मानबेट, मांगेवाडी, बरगेवाडी या ग्रामपंचायती आरक्षित आहेत.
इतर मागास सर्वसाधारण प्रवर्गासाठी बनाचीवाडी, फेजिवडे, कसबा वाळवे, माजगाव, नरतवडे, सोन्याची शिरोली, कासारपुतळे, दुर्गमानवाड, एैनी, कंथेवाडी-कळंकवाडी, हेळेवाडी, धामोड, फराळे, मजरे कासारवाडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. इतर मागास महिलांसाठी आणाजे, चाफोडी तर्फ एैनघोल, चक्रेश्वरवाडी, ढेंगेवाडी, कुडुत्री, कुंभारवाडी, मल्लेवाडी, मुसळवाडी, सावर्दे-वडाचीवाडी, सुळंबी, तळाशी, कारिवडे, भाटेगाव या ग्रामपंचायती आरक्षित आहेत. केळोशी खुर्द एकमेव ग्रामपंचायत अनुसूचित जमातीमध्ये महिला आरक्षित आहे. अनुसूचित जाती सर्वसाधारण गटासाठी तरसंबळे, सावर्डे पाटणकर, मौजे कासारवाडा, पुंगाव, राशिवडे बुद्रुक, कसबा तारळे या ग्रामपंचायती आरक्षित आहेत, तर राशिवडे खुर्द, मोहोडे, करंजफेण, चाफोडी तर्फ तारळे, ठिकपुर्ली, घोटवडे या ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिला अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
भुदरगड तालुक्यातील ९७ सरपंचपदांची सोडत
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षणे पार पडली.
आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती पुरुष - गारगोटी, कडगाव, मठगाव-मानी, अंतिवडे, फणसवाडी. अनुसूचित जाती महिला - नाधवडे, पाल, देऊळवाडी, बिद्री, पेठ शिवापूर, वासनोली, शिवडाव.
नागरिकांचा मागास प्रवर्ग - डेळेचिवाळे, नवरसवाडी, दारवडे, पडखंबे, महालवाडी, ममदापूर, मिणचे बुद्रुक, मोरेवाडी, लोटेवाडी, वेसर्डे, पांगिरे, तिरवडे, कुडतरवाडी, नांगरवाडी. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - मुदाळ, म्हासरंग-उकिरभाटले, कोनवडे, शिंदेवाडी, पाचर्डे, सालपेवाडी, गंगापूर, अनफ खुर्द, अंतुर्ली, मडिलगे बुद्रुक, नांदोली-करंबळी, फये, कोळवण-पाळेवाडी.
सर्वसाधारण महिला - खेडशे-एरंडेपे, खानापूर, निष्णव-कुंभारवाडी, आकुर्डे, वाघापूर, पाल्याचा हुडा, आरळगुंडी, म्हसवे, बेगवडे, तांब्याचीवाडी-चिक्केवाडी, मडूर, नवले, पंडिवरे, आदमापूर, मेघोली, पाटगाव-मानोळे, टिक्केवाडी, बारवे, मडिलगे खुर्द, आंबवणे, निळपण, पळशिवणे, राणेवाडी, करडवाडी, देवकेवाडी, भाटीवडे, सोनारवाडी, चांदमवाडी, व्हणगुत्ती, भंडवडे.
सर्वसाधारण पुरुष - देवर्डे, दोनवडे, बेडीव, कारिवडे, हेदवडे-शिरगाव, कूर, नितवडे, मुरुकटे, शेळोली, दिंडेवाडी, पिंपळगाव, सोनुर्ली, पुष्पनगर, बामणे, वेंगरूळ, पायवडे, कोंडोशी-दासेवाडी, अनफ बुद्रुक, मिणचे खुर्द, नागणवाडी, पारदेवाडी, हणबरवाडी, मानवळे-केळेवाडी, तोंदलेवाडी, जकिनपेठ, कलनाकवाडी, हेळेवाडी, बसरेवाडी, भालेकरवाडी, थड्याचीवाडी, न्हाव्याचीवाडी, वर्पेवाडी, शेणगाव, तांबाळे असे गाववार आरक्षण आहे.
शाहूवाडीत १०६ सरपंचपदासाठी आरक्षण
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत झाली.
अनुसूचित जाती - कोळगाव, आरुळ, गिरगाव, बांबवडे, मालेवाडी, तुरुकवाडी, गेळवडे, तर महिला आरक्षण पुसार्ले, मरळे, गावडी, माणगाव, चांदोली, घोळ, सवडे, टेकोली असे सात ठिकाणी पुरुष, तर सहा ठिकाणी महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले.
नागरिकांचा मागासप्रवर्ग : अणुस्कुरा, पेरीड, गाडेवाडी, शिराळे-वारुण, भेडसगाव, नेर्ले, गोगवे, केर्ले-हुंबवली, लोळाणे, भादळे, साळशी, सुपात्रे, शिराळे तर्फ मलकापूर, माळापुडे, परळे या चौदा ठिकाणी पुरुष, तर गिरगाव, उचत, सवते, रेठरे, गोंडोली, माण, शिवारे, आकुर्ले, सावर्डे, आंबा, वालूर, चरण, वाडीचरण, आंबार्डे, परखंदळे या पंधरा ठिकाणी महिला आरक्षण निश्चित करण्यात आले.
सर्वसाधारण प्रवर्ग - या प्रवर्गासाठी ६४ ग्रामपंचायतींपैकी ३२ महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. पुरषाकरिता उखळू, करंजफेण, ससेगाव, सोनुर्ले, परळी, घुंगूर, वारुळ, उदगिरी, कडवे, शित्तूर तर्फ मलकापूर, सांबू, एैनवाडी, कुंभवडे, सावे, डोणोली, कासार्डे, अमेणी, शित्तूर-वारुण, कोतोली, खोतवाडी, कातळेवाडी, करुंगळे, बजागेवाडी, हारुगडेवाडी, वडगाव, खुटाळवाडी, खेडे, ओकोली, पाटणे, शेंबवणे, बहिरेवाडी, येळाणे, तर महिलांसाठी कोपार्डे, गजापूर, विशाळगड, ग्रुप, येळवण जुगाई, निळे, सावर्डे बुद्रुक, सोंडोली, कांदवण, मोळापडे, करंजोशी, जांबूर, पणुंद्रे, भेंडवडे, पिशवी, वरेवाडी, पेंडागळे, बुरंबाळ, सोनवडे, थेरगाव, सेद्रापूर ग्रुप, आळतूर, मानोली, शिंपे, सरुड, थावडे, विरळे, येलूर, कापशी, चनवाड-शाहूवाडी, नांदगाव, मोसम, परळेनिनाई, मांजरे अशा १०६ ग्रामपंचायतींची आरक्षणे काढण्यात आली.
आजरा तालुक्यातील ७४ सरपंचपदाचे आरक्षण
आजरा : आजरा तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत झाली.
प्रवर्गनिहाय जाहीर झालेले आरक्षण असे - अनुसूचित जाती महिला - पेरणोली, साळगाव, शेळप, मुमेवाडी, अनुसूचित जाती पुरुष - हाळोली, कासारकांडगाव, बुरुडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - मुरुडे, श्रृंगारवाडी, पारपोली, सरंबळवाडी, हरपवडे, करपेवाडी, इटे, सुळे, गजरगाव, दाभील, नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष - चांदेवाडी, होन्याळी, सरोळी, वाटंगी, आर्दाळ, देवर्डे, गवसे, मासेवाडी, कानोली, देवकांडगाव, सर्वसाधारण महिला राखीव - महागोंड, कोवाडे, शिरसंगी, हाजगोळी बुद्रुक, हाजगोळी खुर्द, खानापूर, खेडे, कोरिवडे, वझरे, सोहाळे, सुळेरान, मसोली, चिमणे, वेळवट्टी, होनेवाडी, लाटगाव, पोळगाव, भादवणवाडी, बेलेवाडी, जाधेवाडी, देऊळवाडी, पेंढारवाडी, कोळिंद्रे.
सर्वसाधारण (खुला) प्रवर्ग - हालेवाडी, चव्हाणवाडी, खोराटवाडी, यरंडोळ, निंगुडगे, मलिग्रे, हत्तिवडे, किणे, पेद्रेवाडी, आजरा, भादवण, बहिरेवाडी, चाफवडे, चितळे, धामणे, किटवडे, आंवढी, मडिलगे, मेंढोली, वडकशिवाले, उत्तूर, सुलगाव, झुलपेवाडी, लाकूडवाडी.
शिरोळमध्ये सरपंच आरक्षण सोडत जाहीर
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत पद्धतीने मंगळवारी झाले. तालुक्यातील अकिवाट, अर्जुनवाड, मौजे आगर, औरवाड, गौरवाड, कनवाड यासह १३ गावांचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष सरपंचपदासाठी निश्चित झाले आहे.
यावेळी सुरुवातीला दहा ग्रामपंचायतींच्या अनुसूचित जाती सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये अनुसूचित जाती महिला सरपंचपदासाठी-तमदलगे, नवे दानवाड, हरोली, बस्तवाड, तर अनुसूचित पुरुषांकरिता शिरदवाड, कोंडिग्रे, उमळवाड, चिपरी, तेरवाड तसेच अनुसूचित जमाती सरपंचपदासाठी जांभळी, अब्दुललाट. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सरपंचपदासाठी - घालवाड, संभाजीपूर, शेडशाळ, नांदणी, चिंचवाड, शिरोळ, शिरढोण तर ना. मा. प्र. वर्ग पुरुष सरपंचपदासाठी- कवठेगुलंद, खिद्रापूर, घोसरवाड, जुने दानवाड, बुबनाळ, हसूर, धरणगुत्ती अशी सात गावे निश्चित झाली. उर्वरित २७ ग्रामपंचायतीपैकी सर्वसाधारण सरपंचपदासाठी १४ महिला, तर १३ गावे पुरुष जागेसाठी आरक्षित करण्यात आली. सर्वसाधारण महिला (१४ जागा) सरपंचपदासाठी आरक्षित गावे अशी- आलास, उदगाव, कवठेसार, कुटवाड, कोथळी, गणेशवाडी, टाकळी, दत्तवाड, नृसिंहवाडी, मजरेवाडी, यड्राव, लाटवाडी, राजापूर, दानोळी, सर्वसाधारण पुरुष सरपंच (गावे १३) - अकिवाट, अर्जुनवाड, मौजे आगर, औरवाड, गौरवाड, टाकळीवाडी, टाकवडे, राजापूरवाडी, शिरटी, शिवनाकवाडी, कनवाड, हेरवाड, जैनापूर.
पन्हाळा तालुक्यातील १११ सरपंचपदाचे आरक्षण
पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील १११ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले.
ग्रामपंचायतीसाठी आरक्षण पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण खुले : कोतोली, कसबा ठाणे, घरपण, पिंपळे तर्फ ठाणे, शहापूर, दिगवडे, आपटी, वाळवेकरवाडी, गोठे, सोमवार पेठ, काळजवडे, किसरुळ, कोदवडे, कोलोली, पोर्ले तर्फ ठाणे, आसुर्ले, काखे, वेतवडे, गोगवे, माळवाडी (के), आंबवडे, पणुत्रे, सुळे, काटेभोगाव, करंजफेण, खोतवाडी, नणुंद्रे, पैजारवाडी, मिठारवाडी, कुंभारवाडी, मानवाड, बुधवारपेठ, बाजारभोगाव.
सर्वसाधारण महिला : गोलीवडे, पुनाळ, पोहळे तर्फ बोरगाव, कुशिरे तर्फ ठाणे, सातार्डे, तिरपण, पोखले, पणोरे, घोटवडे, सावर्डे तर्फ असंडोली, वाघुर्डे, म्हाळुंगे तर्फ बोरगाव, मोहरे, आरळे, तेलवे, धबधबेवाडी, देवाळे, उत्रे, आवळी, हरपवडे, नावली, वाळोली, वारनुळ, मोरेवाडी, साळवाडी, जाफळे, माजनाळ, आळवे, वाडी रत्नागिरी, आसगाव, परखंदळे, महाडिकवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : कोडोली, यवलूज, बहिरेवाडी, जाखले, पोहाळे तर्फ आळते, माजगाव, पाटपन्हाळा, पिंपळे तर्फ सातवे, दरेवाडी, कोलिक, माळवाडी (एम), बादेवाडी, पिसात्री, बोंगेवाडी,
कणेरी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : कळे, सातवे-शिंदेवाडी, माले, सावर्डे तर्फ सातवे, बोरीवडे, जेऊर-म्हाळुंगे तर्फ ठाणे, उंड्री, पोर्ले तर्फ बोरगाव, आकुर्डे, पोहाळवाडी, इंजोळे, चव्हाणवाडी, शिंदेवाडी (एम), निकमवाडी, वेखंडवाडी.
अनुसूचित जाती सर्वसाधारण - राक्षी, गिरोली, तांदूळवाडी, मल्हारपेठ, बांदिवडे, कसबा बोरवाड, मरळी, पडळ. अनुसूचित जाती महिला : आंबर्डे, निवडे, देवठाणे, पुशिरे तर्फ बोरगाव, वाघवे-गुडे, केखले, नेबापूर, पोंबरे. अनुसूचित जमाती महिला : बोरपाडळे.
कागल तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण
कागल : कागल तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी येथील बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले.
गावनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : व्हन्नूर (अनुसूचित जाती महिला), पिंपळगाव खुर्द, कसबा सांगाव (अनुसूचित जाती), रणदिवेवाडी (सर्वसाधारण महिला), सुळकूड (खुले), एकोंडी (अनुसूचित जाती), सिद्धनेर्ली (सर्वसाधारण महिला), वंदूर (अनुसूचित जाती), शंकरवाडी (ओबीसी), शेंडूर (खुले), बामणी (खुले), व्हनाळी (ओबीसी महिला), बाचणी (ओबीसी), केंबळी (ओबीसी महिला), बेलवळे खुर्द (ओबीसी महिला), बेलवळे बुद्रुक (अनुसूचित जाती महिला), साके (खुला), वाळवे खुर्द (सर्वसाधारण महिला), पिराचीवाडी (खुले), म्हाकवे (ओबीसी), आणूर (सर्वसाधारण महिला), पिंपळगाव बुद्रुक (सर्वसाधारण महिला), चौंदाळ (खुले), मळगे बुद्रुक (सर्वसाधारण महिला), मळगे खुर्द (ओबीसी), बानगे (सर्वसाधारण महिला), उंदरवाडी (ओबीसी महिला), फराकटेवाडी (ओबीसी), बोरवडे (खुले), बिद्री (अनुसूचित जाती महिला), सोनाळी (ओबीसी महिला), निढोरी (खुले), कुरणी , भडगाव (सर्वसाधारण महिला), शिंदेवाडी, दौलतवाडी (खुले), चिमगाव (सर्वसाधारण महिला), अवचितवाडी (खुले), यमगे (सर्वसाधारण महिला), सुरुपली (अनुसूचित जाती), कुरुकली (अनुसूचित जाती), सोनगे (अनुसूचित जाती महिला), बस्तवडे (इतर मागासवर्गीय), कोलगे (सर्वसाधारण महिला), चिखली (अनुसूचित जाती महिला), मेतके (सर्वसाधारण महिला), बेनिक्रे (खुले), हळदी (सर्वसाधारण महिला), अर्जुनवाडी, गलगले (खुले), खडकेवाडा (सर्वसाधारण महिला), अर्जुनी (सर्वसाधारण महिला), लिंगनूर कापशी (खुले), जैन्याळ ( सर्वसाधारण महिला), मुंगळी (ओबीसी), हमीदवाडा (ओबीसी महिला), नंद्याळ (ओबीसी महिला), हळदवडे (सर्वसाधारण महिला), करजीवणे (ओबीसी), आणेवाडी (खुले), बोळावीवाडी (सर्वसाधारण महिला), बेलेवाडी मासा (ओबीसी महिला), आलाबाद (सर्वसाधारण महिला), बाळिक्रे (ओबीसी महिला), बाळेघोल (ओबीसी महिला), हणबरवाडी (खुले), तमनाकवाडा (खुले), वडगाव (सर्वसाधारण महिला), कासारी (अनुसूचित जाती महिला), हसूर खुर्द (सर्वसाधारण महिला), बोळावी (खुले), हसूर बुद्रुक (खुले), मांगनूर (ओबीसी), बेलेवाडी काळम्मा (खुले), माद्याळ (सर्वसाधारण महिला).


गगनबावड्यात २९ सरपंचपदांचे आरक्षण
साळवण : गगनबावडा तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती पुरुष - किरवे, वेतवडे, शेणवडी. अनुसूचित जाती महिला - असळज, कातळी, कडवे. इतर मागास प्रवर्ग पुरुष - बोरबेट, अणदूर, मार्गेवाडी, तळये बुद्रुक.
इतर मागास प्रवर्ग महिला-मुटकेश्वर, खोकुर्ले, खेरिवडे, जर्गी. सर्वसाधारण खुला महिला - बावेली, मांडुकली, वेसर्डे, धुंदवडे, लोंघे, सांगशी, साखरी, म्हाळुंगे. सर्वसाधारण खुला पुरुष-गगनबावडा, साळवण, निवडे, शेळोशी, तिसंगी, कोदे बुद्रुक, कोदे खुर्द, मणदूर या गावांचा समावेश आहे.

Web Title: Himalayan village, Mahilaraj; The disappointment of the seekers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.