शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दाट धुके, पावसाच्या सरी अन् 'जय भवानी..जय शिवाजी'च्या जयघोषात पन्हाळा-पावनखिंड मोहिमेला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 17:51 IST

पन्हाळा: दाट धुके, गार वारा व पावसाच्या सरी अशा निसर्गरम्य वातावरणात  'जय भवानी..जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, हर..हर..महादेव, नरवीर ...

पन्हाळा: दाट धुके, गार वारा व पावसाच्या सरी अशा निसर्गरम्य वातावरणात  'जय भवानी..जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, हर..हर..महादेव, नरवीर शिवा काशिद व बाजीप्रभू देशपांडे की जय..' या घोषणांनी संपूर्ण पन्हाळगड दणाणून गेला होता. ऐतिहासिक वातावरणात हिल रायडर्स फाउंडेशनच्या ६८ व्या पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंतीचा प्रारंभ झाला.या मोहिमेचा प्रारंभ प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे प्रादेशिक अधिकारी अंकुश पाटील, सचिन हरबट, हिल रायडर्स अडव्हेंचर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील, पन्हाळाचे माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, घोडावत ग्रुपचे प्रवीण डिग्रजे, यांच्या हस्ते वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला. यावेळी हिलरायडर्सचे सागर बगाडे, विनोद कांबोज, बंडा साळोखे आदी उपस्थित होते. मोहिम सुरू करण्याच्याअगोदर सकाळी पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर येथील नरवीर शिवा काशिद समाधीला प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.अतिशय खडतर स्थितीत शिवाजी महाराजांनी काळोखात धो-धो पावसात पन्हाळगड ते पावनखिंड गनिमी कावा मोहीम सर केली होती. या मोहिमेत वीर बाजी प्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्यासह अनेक मावळ्यांनी बलिदान दिले. स्वराज्य स्थापनेसाठी राज्यांचा त्याग आणि मावळ्यांचे बलिदान शिवकालीन इतिहास आजच्या युवा पिढीला समजावा यासाठी हिल रायडर्स अडव्हेंचर फाऊंडेशन, कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती ट्रेकिंग मोहीम आयोजित करण्यात आली.पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेत एक हजार इतक्या मोठ्या संख्येने युवक युवती सहभागी झाल्या आहेत. यावेळी या मोहिमेत मुकबधिर असलेले पंधरा विद्यार्थी सहभागी झाले. मोहिमेत मुलुखगिरी ग्रुपच्यावतीने 'मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या विशाळगडाला मुक्ती द्या, एक-एक इंच जमिनीचा हिशोब घ्या, विशाळगडाला मोकळा श्वास द्या, सर्वांचे लक्ष विशाळगडाकडे अशा अशायाचे फलक घेऊन युवक सहभागी झाले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर