शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

हिल रायडर्सतर्फे जुलैमध्ये पन्हाळा-पावनखिंड मोहीम

By admin | Updated: June 24, 2016 01:11 IST

मोहिमेदरम्यान वाटेतील वाड्यांवर मुला-मुलींसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे.

कोल्हापूर : हिल रायडर्स गु्रपतर्फे ऐतिहासिक पन्हाळा-पावनखिंडची पहिली मोहीम २ व ३ जुलैला, तर दुसरी मोहीम दि. २३ व २४ जुलैला आयोजित केल्याची माहिती गु्रपचे अध्यक्ष प्रमोद पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. १९८६ पासून कोल्हापूरचा ‘हिल रायडर्स अ‍ॅँड हायकर्स गु्रप’ महाराष्ट्रातील तसेच देशभरातील ट्रेकर्ससाठी प्रसिद्ध ‘पन्हाळा ते पावनखिंड’ ही ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम आखत आहे. यंदाही या राज्यस्तरीय मोहिमेत पुणे, मुंबई, विदर्भ, मराठवाडा, गुजरात, कोकण, कर्नाटकातून हजारो युवक-युवती सहभागी होणार आहेत. पहिल्या मोहिमेनंतर २३ व २४ जुलैला दुसरी मोहीमही काढली जाणार आहे. मोहिमेदरम्यान वाटेतील वाड्यांवर मुला-मुलींसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. इच्छुकांनी शिवस्वरूप स्टेशनर्स, खरी कॉर्नर, समीर अ‍ॅडव्हेंचर्स, हॉटेल पर्लशेजारी, स्टुडिओ एक्स्पोज, राजारामपुरी आठवी गल्ली, सुपरसॉनिक नेट झोन, सायबर रोड, कोल्हापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन पाटील व देवणे यांनी केले आहे. यावेळी युवराज साळोखे, चंदन मिरजकर, सूरज डोली, सागर बकरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मोहिमेचा मार्ग असा...पन्हाळगडावरील वीर शिवा काशीद पुतळा व नरवीर बाजीप्रभूंच्या पुतळ्याचे पूजन करून फुटका नंदीमार्गे मोहिमेस सुरुवात केली जाणार आहे. तेथून मसाई पठार-खोतवाडी-मांडलाईवाडी-करपेवाडी-आंबर्डे तर्फ आंबवडे येथे रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी रिंगेवाडी-कळकेवाडी-मळेवाडी-पाटेवाडी-सुकाम्याचा धनगरवाडा-म्हसवडे वाडा-पांढरे पाणी ते पावनखिंड येथे मोहीम समाप्त होणार आहे. यांचाही सहभागहिमालयातील २० हजार फुटांवर असणारे नोरबू हे शिखर यशस्वीरीत्या सर करणारे कोल्हापूरचे उदयोन्मुख गिर्यारोहक शिवतेज पाटील, खुशी कांबोज, प्रसाद आडनाईक, शैलेश भोसले हेही इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.