शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘आडवाटेवरचं कोल्हापूर’चे मोफत दर्शन-चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून ‘हिल रायडर्स’चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:48 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास व्हावा व दुर्लक्षित पर्यटनस्थळे व त्यांचा इतिहास लोकांसमोर येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून पर्यटकांसाठी मोफत

ठळक मुद्दे १३ एप्रिलपासून दोन बसेस धावणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास व्हावा व दुर्लक्षित पर्यटनस्थळे व त्यांचा इतिहास लोकांसमोर येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून पर्यटकांसाठी मोफत ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ दर्शनाचा उपक्रम सुरू केल्याची माहिती विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे,हिल रायडर्स फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. दि. १३ एप्रिलपासून शुक्रवार व शनिवारी दोन-दोन बसेस सुटणार असून, यामध्ये ५० टक्के स्थानिक पर्यटकांना, तर उर्वरित बाहेरील पर्यटकांना राखीव राहील, असेही त्यांनी सांगितल.

हिल रायडर्स फौंडेशन, एक्टिव्ह चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सहलीचे आयोजन केले असून, हॉटेल मालक संघ, विविध संघटना, बचत गटांचे सहकार्य लाभल्याचे सांगत पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड म्हणाले, कोल्हापुरात पर्यटक आला की जोतिबा, अंबाबाई, नृसिंहवाडी येथेपर्यंत मर्यादित राहतो; पण कोल्हापूरच्या दुर्गम डोंगरांत अनेक छुपी पर्यटनस्थळे आहेत. प्राचीन गुहा, गड, शिल्पे, युद्धभूमी, मंदिरे, जंगले यांचे दर्शन पर्यटकांना व्हावे, पर्यटनस्थळे सक्षम होतीलच पण तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होईल, यासाठी पालकमंत्री पाटील यांनी ही संकल्पना पुढे आणली.निसर्गमित्र अनिल चौगुले म्हणाले, सहलीचा मार्ग निसर्गरम्य आहे. शिवडाव येथील देवराई व तेथील लोकांचे नाते वेगळे आहे. येथे पंचमहाभूतांचा अनुभव येतो, इतका सुंदर परिसर आहे. अशी अनेक ठिकाणे आपण या माध्यमातून पाहू शकता. यावेळी सुजय पित्रे, राहुल कुलकर्णी, चारूदत्त जोशी, आदी उपस्थित होते.आॅनलाईन बुकिंगदोन दिवसांची मुक्कामी सहल, निवास, भोजन व्यवस्था मोफत आहे. आॅनलाईन बुकिंग करून यामध्ये सहभागी होता येणार असून, बुकिंगनुसारच पर्यटकांना संधी दिली जाणार आहे. एका सहलीत शंभर व्यक्ती सहभागी होऊ शकतात. बुकिंगसाठी www.unexploredkolhapur.com वर नोंदणी करायची आहे. त्याशिवाय याबाबत अधिक माहितीसाठी समित अ‍ॅडव्हेंचर्स (पर्ल हॉटेलजवळ, कोल्हापूर). येथे संपर्क साधावा.असे आहे नियोजन-वार तारीख कोणासाठीशुक्रवार १३ एप्रिल फक्त पुरुषशनिवार १४ एप्रिल फक्त महिलाशुक्रवार २० एप्रिल फक्त पुरुषशनिवार २१ एप्रिल फक्त महिलाशुक्रवार २७ एप्रिल सहकुटुंबशनिवार २८ एप्रिल फक्त पुरुषशुक्रवार ४ मे फक्त पुरुषशनिवार ५ मे फक्त महिलाशुक्रवार ११ मे फक्त पुरुषशनिवार १२ मे फक्त महिलाशुक्रवार १८ मे सहकुटुंबशनिवार १९ मे फक्त पुरुषशुक्रवार २५ मे फक्त महिलाशनिवार २६ मे सहकुटुंबअस्सल ग्रामीण नाष्टा-जेवणचहा-नाष्टा व दोन्ही वेळचे जेवण मोफत दिले जाणार आहे. तेथील अस्सल पारंपरिक जेवण स्थानिक बचतगट देणार आहेत. त्यामध्ये नाचणीची भाकरी, डांगर, पिठल्याचा आस्वाद घेता येणार आहे.असा असणार सहलीचा मार्ग-दसरा चौक-पोहाळे (ता. पन्हाळा) लेणी-शिवाजीची विहीर-पावनखिंड, येळवण जुगाई मंदिर-अणुस्कुरा जंगलात पदभ्रमंती-तिसंगी (जेवण)-पळसंबा शिल्प- सांगशी-बोरबेट जंगलातून चक्रेश्वरवाडी-काळम्मावाडी (रात्रीची विश्रांती)-कडगाव, पाटगाव मौनी महाराज मठाचे दर्शन-शिवडाव येथील देवराई, मेघोली-शिरसंग येथील वटवृक्ष-नेसरी-कोल्हापूर.आडवाटेवरची वैशिष्ट्ये-राष्ट्रीय  अभयारण्याचा अनुभव६०० पैकी १०० किलोमीटरचा जंगलातून प्रवासतीन किलोमीटरची जंगलातून पदभ्रमंतीप्राचीन गुहा, शीलालेख, वास्तू मंदिरे असा पुरातत्त्व ठेवारोमांचकारी युद्धभूमीच्या परिसराला भेटसह्याद्रीच्या पर्वतरांगेतून भव्य पठार, खोल दऱ्या व समृद्ध जंगलाचा नजराणा.‘रानमेवा’ चाखण्याची संधीचक्रेश्वरवाडी येथे ३६० डिग्रीमधून आकाशाचे निरीक्षण

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन