शहरातील प्रमुख चौकात उभारणार उच्च दृश्यमानता सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:41+5:302021-07-18T04:18:41+5:30
कोल्हापूर : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी गर्दीच्या चौकातील सिग्नल सहज नजरेत यावेत, त्यासाठी उच्च दृश्यमानता सिग्नल बसविण्यासाठी पालकमंत्री सतेज ...

शहरातील प्रमुख चौकात उभारणार उच्च दृश्यमानता सिग्नल
कोल्हापूर : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी गर्दीच्या चौकातील सिग्नल सहज नजरेत यावेत, त्यासाठी उच्च दृश्यमानता सिग्नल बसविण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. अशा पद्धतीचा पहिला प्रायोगिक तत्त्वावर सिग्नल ताराराणी चौकात बसविण्यात आला. आमदार ऋतुराज पाटील यांनी या सिग्नलची पाहणी केली.
शहरात वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अरुंद रस्ते व वाहनांची संख्या मोठी यामुळे रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ वाढून कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहरात चौकाचौकात सिग्नल बसविले आहेत. गर्दीच्या चौकात चौकातील सिग्नल चालकांना सहजपणे दिसावेत. यासाठी उच्च दृश्यमानता सिग्नल बसविण्याचे काम पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकारातून महापालिका प्रशासनाने हाती घेतले. ताराराणी चौकात प्रायोगिक तत्वावर उच्च दृश्यमानता सिग्नल बसविला आहे. हा सर्वांच्या सहज नजरेत येतो. पालकमंत्री पाटील यांच्या निधीतून शहरात दहा चौकात हे सिग्नल बसविण्यात येणार आहेत. आमदार ऋतुराज पाटील यांनी या सिग्नलची पाहणी केली. त्यांबाबत आवश्यक त्या सूचनाही त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अरुण गवळींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.