शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक हाय व्हय..?

By admin | Updated: October 12, 2014 00:53 IST

पक्ष, उमेदवारांबाबत मतदारच अनभिज्ञ : जतमधील वाड्यावस्त्यांवरील चित्र

संतोष मिठारी / जतराष्ट्रीय, राज्य पातळीवरील दिग्गजांच्या सभा, पदयात्रा, मेळावे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचा सर्वत्र धुरळा उडत आहे. प्रचाराची सांगता होण्यास दोन दिवसांचा अवधी आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या जत (जि. सांगली) तालुक्यातील सुमारे दोनशेहून अधिक वाड्यावस्त्यांवरील मतदार निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या पक्ष आणि उमेदवारांबाबत अनभिज्ञच असल्याचे चित्र आहे.तालुकयात १२३ गावे आणि २७६ वाड्यावस्त्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, जतमधील सुमारे दोनशेहून अधिक वाड्यावस्त्यांमधील बहुतांश मतदारांना कोणती निवडणूक आहे, निवडणुकीत कोणते पक्ष आणि कोणते उमेदवार उतरले आहेत, याची कल्पनाच नसल्याचे चित्र आहे. तालुका पातळीवरील बाजाराच्या ठिकाणी, बऱ्यापैकी असलेल्या डांबरी रस्त्यांवर उमेदवाराचे नाव, केलेल्या कामांची माहिती ध्वनिवर्धकावरून देत दिवसांतून तीन-चारवेळा फिरणाऱ्या झेंडे, बॅनर लावलेल्या चारचाकी दिसतात. मात्र फोंडामाळ, खडकाळ रस्ते असलेल्या तसेच ४०-५० कुटुंब असलेल्या वाड्यावस्त्यांवर प्रचार पोहोचलेला नाही. कोकरेवाडी, साळमळगेवाडी, पसारवाडी, कुडाळवाडी, टोणेवाडी आदी वाड्यावस्त्यांवरील अधिकतर वृध्द महिला-पुरूष मतदारांना निवडणुकीची कल्पनाच नाही. बनाळीकडून कोकरेवाडीतील घराकडे निघालेल्या एका महिलेला निवडणुकीबाबत विचारले असता तिने ‘निवडणूक हाय व्हय’ असा सवाल केला आणि ‘असंलच निवडणूक, तर घरातील सांगतील त्यावर मारायचा शिकका’, असे उत्तर दिले. सुशिक्षित लोक सांगतील त्यालाच मतदान करायचे, असा अलिखित नियमच घालून घेतला आहे.