हर्षल जाधव, विनायक होगाडे विवेक जागर साथी पुरस्काराचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:23 IST2021-02-14T04:23:05+5:302021-02-14T04:23:05+5:30
कोल्हापूर : राधानगरीचे शिक्षक हर्षल जाधव व इचलकरंजीतील राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते विनायक होगाडे हे यंदाचे विवेक जागर साथी पुरस्काराचे ...

हर्षल जाधव, विनायक होगाडे विवेक जागर साथी पुरस्काराचे मानकरी
कोल्हापूर : राधानगरीचे शिक्षक हर्षल जाधव व इचलकरंजीतील राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते विनायक होगाडे हे यंदाचे विवेक जागर साथी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. चिरंतनी स्वाती कृष्णात हिच्या वाढदिवसानिमित्त विवेक जागर मंचच्यावतीने हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराचे वितरण आज रविवारी सायंकाळी ६ वाजता कसबा तारळे व २१ फेब्रुवारीला इचलकरंजीत होणार आहे, अशी माहिती जागर मंचचे अध्यक्ष रमेश माणगावे, कार्याध्यक्ष सुनील स्वामी, सचिव स्वाती कृष्णात यांनी दिली.
दोघेही पुरस्कार्थी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. जाधव हे राधानगरी येथील हुंबेवाडा धनगरवाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. जोडीदाराची विवेकी निवड, संविधान आणि आपण, स्त्रिया आणि अंधश्रध्दा, गांधी समजून घेताना, मूर्ती दान, होळी लहान, पोळी दान, फटाकेमुक्त दिवाळी, व्यसनमुक्ती, बुवाबाजी अशा कामात त्यांचा विशेष पुढाकार राहिला आहे.
विनायक होगाडे हे लहानपणापासून राष्ट्रीय सेवा दलात काम करतात. अंनिसच्या लोकरंगमंचच्या रिंगण नाट्यात सहभागी होऊन नाटक, भारुड, गाण्यांचे राज्यभर कार्यक्रम, नरेंद्र दाभाेळकर खुनाच्या तपासासाठी जवाब दो आंदोलनाची जबाबदारी घेतानाच पुस्तके, लेख, शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून समाजासमोर सत्य आणण्यासाठी त्यांचा पुढाकार राहिला आहे.
फोटो:
१३०२२०२१-कोल-हर्षल जाधव
१३०२२०२१-कोल-विनायक होगाडे