हेरले ग्रामस्थांचा ग्रामपंचायतवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:24+5:302021-07-14T04:28:24+5:30
अतिक्रमण केलेला सिद्धेश्वर नगर,हनुमान नगर रस्ता खुला करण्यासाठी सिद्धेश्वर नगरापासून ग्रामस्थ मोर्चाने हातांमध्ये ‘अतिक्रमण हटाव, ...

हेरले ग्रामस्थांचा ग्रामपंचायतवर मोर्चा
अतिक्रमण केलेला सिद्धेश्वर नगर,हनुमान नगर रस्ता खुला करण्यासाठी सिद्धेश्वर नगरापासून ग्रामस्थ मोर्चाने हातांमध्ये ‘अतिक्रमण हटाव, सरकारी रस्ता बचाव’ असे अनेक फलक घेऊन घोषणा देत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आले.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना चर्चेस बोलविले.
यावेळी जवाहर साखर कारखाना संचालक आदगोंडा पाटील, राजेंद्र कचरे, अमर वड्ड,अर्जुन पाटील ,ग्रामपंचायत सदस्य बटुवेल कदम, अधिक इनामदार यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यावर गावातील अतिक्रमणाच्या विरोधात प्रश्नांची सरबत्ती केली.
आदगोंडा पाटील यांनी गावात रस्ता अतिक्रमण करण्यासाठी ग्रामपंचायतने किती दर काढला आहे, अशी जाहीर विचारणा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना केल्यानंतर त्यांना निरुत्तर व्हावे लागले.
गावातील सर्व अतिक्रमणे तत्काळ काढावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे केली. तसेच सिद्धेश्वर नगर रस्त्यावर झालेले अतिक्रमण तात्काळ काढावे, अशी मागणी लावून धरली.
यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी
हातकणंगले तहसीलदार यांनी सर्वांना चर्चेस हातकणंगले येथे बोलविले असल्याचे सांगितले .
याबाबत हातकणंगले तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी गट क्रमांक ४०४ रस्त्याबाबत दोन्ही गटांना नोटीस बजावली असून यावर शुक्रवारी दि १६ रोजी योग्य त्या कागदपत्रांसह सुनावणीस हजर राहण्यास सांगितले आहे.
यावेळी उपसरपंच सतीश काशीद,ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले, राहुल शेटे, संदीप चौगुले,मंडल अधिकारी भरत जाधव, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, तलाठी एस. ए. बरगाले, विश्वजित भोसले, समीर पेंढारी, राजू बारगिर, बाबासाहेब रुईकर, रफिक पेंढारी, प्रवीण सावंत, नंदू जाधव, सुकुमार कोळेकर,सयाजी गायकवाड यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.