माद्याळ येथे दोन हत्तींचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:39+5:302021-07-14T04:27:39+5:30
पेरणोली : देवर्डेपैकी माद्याळ (ता. आजरा) येथे दोन हत्तींनी एकाचवेळी धुमाकूळ घालून भात तरवे व उसाचे मोठे नुकसान ...

माद्याळ येथे दोन हत्तींचा धुमाकूळ
पेरणोली : देवर्डेपैकी माद्याळ (ता. आजरा) येथे दोन हत्तींनी एकाचवेळी धुमाकूळ घालून भात तरवे व उसाचे मोठे नुकसान केले आहे.
येथील रांगी नावाच्या शेतात दोन हत्तींनी आठ दिवसांपासून तळ ठोकला आहे. एकाच वेळी हे दोन हत्ती पिकामधून पाठोपाठ फिरत आहेत. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
रोप लावणीसाठी आलेले तरवे फस्त केले आहेत, तर उसाचे मोठे नुकसान करण्यात आले आहे.
यामध्ये शिवाजी शेळके, सुरेश शेळके, मनोहर बोलके, महादेव शेळके, हणमंत शेळके, तुकाराम बोलके, विठोबा बोलके, आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बारमाही हत्तीकडून नुकसान होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. मिळणारे नुकसानही तुटपुंजे असल्याने पश्चिम भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
फोटो ओळी : देवर्डेपैकी माद्याळ (ता. आजरा) येथील शिवाजी शेळके, मनोहर बोलके, आदी शेतकऱ्यांच्या ऊस व भात तरव्यांचे हत्तींनी केलेले नुकसान.
क्रमांक : १२०७२०२१-०१